आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या वसतिगृहात जेव्हा ऐन मध्यरात्री होते मुलीची ‘एण्ट्री’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांच्या वसतिगृहात बुधवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान एका मुलीची ‘एण्ट्री’ झाली. प्रकरण संशयास्पद वाटल्याने संबंधित मुलीला प्रथम मुलींच्या वसतिगृहात नेण्यात आले आणि नंतर नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. गुरुवारी दिवसभर महाविद्यालयात या प्रकरणाची चर्चा होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा बुधवारी वाढदिवस होता. रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरा होत असल्याचे वसतिगृह अधीक्षकांच्या लक्षात आल्यानंतर ते तिथे गेले. त्यांना अचानक एक मुलगी गाडीवरून येताना दिसली. त्यानंतर तिची चौकशी केली असता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे तिने सांगितले, मात्र मुलीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिला रात्रभर मुलींच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी या मुलीच्या नातेवाइकांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. ही मुलगी या भावी डॉक्टरची मैत्रीण असल्याचे समोर आले आहे.

ती मुलगी शहरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असून, अमरावती येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मुलाची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता वृंदा सहस्त्रभोजने यांनी दिले आहेत.