आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरीत बेवारस अर्भक आढळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला | मोठीउमरी येथे रविवारी सकाळी ८.३० वाजता स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले. या मुलीची तब्येत ठणठणीत असून, तिला पोलिसांनी स्त्री रुग्णालयात दाखल केले आहे.

संत सेना महाराज मंदिराजवळील भुईभार ले-आउटमध्ये सकाळी नवजात अर्भकाचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांनी रिकाम्या असलेल्या ले-आउटमध्ये जाऊन बघितले असता, त्यांना एका कपड्यात गुंडाळून ठेवलेले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यांनी सिव्हिल लाइन पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्या नवजात मुलीला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या अर्भकावर उपचार केले. मुलीचा जन्म नको म्हणून िकंवा अनैतिक संबंधातून या अर्भकाचा जन्म झाला असावा, त्यामुळे या अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.