आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यास दुसऱ्या दिवशीही आढळले अर्भक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्या बंगल्याच्या गेटसमोरच सोमवारी सकाळी स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याचा प्रकार घडला. यानंतरही पीसीपीएनडीटी पथकाकडून साधी विचारपूसही या प्रकाराची केली नसल्याचे वास्तव आहे.

रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांचा बंगला आहे. स्वराजपेठेतील गजानन महाराज मंदिराच्या बाजूला एक नवजात बालक रडत होते. रस्त्याने जाणाऱ्यांना हे बालक बेवारस अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी रामदासपेठ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळावरून स्त्री जातीच्या अर्भकाला ताब्यात घेतले आणि त्याला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. हे अर्भक एक दिवसापूर्वी जन्मलेले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मोठी उमरीतून दोन तासांपूर्वी जन्मलेली मुलगी ताब्यात घेतली होती. या दोन्ही घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पीसीपीएनडीटी पथकाचे दुर्लक्ष विशेष म्हणजे रविवारीसुद्धा मोठी उमरीमध्ये एक नवजात मुलगी बेवारस अवस्थेत आढळून आली होती. शहरात सलग दुसऱ्या दिवशीही स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आणि मुलगी वाचवा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या पीसीपीएनडीटी पथकाकडून या प्रकाराची साधी शहानिशा चौकशीही केली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.