आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाच्या हेतूनेच आरोपी नेणार होते मुलीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अल्पवयीन मुलीला लग्न करण्यासाठीच राजस्थानला नेण्यात येणार होते. आरोपींचा मुलीला अनैतिक व्यापारासाठी पळवून नेण्याचा उद्देश नव्हता, हे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

वाशिम बायपास परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने तिचा विवाह राजस्थानमधील जोधपूरच्या एका युवकाशी तीन महिलांच्या मध्यस्थीने निश्चित केला. शनिवारी संध्याकाळी ही मुलगी आजीसोबत गांधी रोडवर खरेदीसाठी आली होती. पोलिसांनी या मुलीसह तिच्या आजीला चौकशीसाठी सिटी कोतवालीत ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अकोला आणि राजस्थान येथील 14 आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले. राजस्थान येथील आरोपी केवळ लग्नानंतर तिला नांदण्यासाठीच मुलीला नेणार होते, हे प्राथमिक चौकशीअंती समोर आले. अर्थात सखोल तपासानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

.तरच मिळते मुलगी
पोलिसांनी राजस्थान येथील आरोपींची चौकशी केली. राजस्थानमध्ये मुलांच्या तुलनेने मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे मुलगी असलेल्या घरातीलच मुलाशी विवाह लावण्यात येतो, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

आरोपी कारागृहात
आरोपींची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपींमध्ये वासुदेव लालराम सेन (वय 22), सुरंदर पन्नालाल गेहलोत (रा 40), लाल मुलाराम (वय 45) नरेंद्र चोथमल (नायक) (वय 24), रुकय्या बेगम मजिद कान (वय 60), बानो हनिफ खान (वय 40, सर्व रा. जालोरी, जिल्हा जोधपूर), सायरा बी शेख समत (वय 50, रा. अकबर प्लॉट, अकोटफैल), सुनीता बंडू दामोदर (वय 35 रा. हरिहरपेठ), लक्ष्मीबाई गोविंद शिंधाóो (वय 62 रा. रमाबाईनगर), उज्‍जवला विष्णू तायडे (वय 35, रा. अंबिकानगर), गीता दामोदर इंगळे (वय 70, गौतमनगर), सुशीला किसन तेलगोटे ( रा. अंबिकानगर) आणि शहनाज बेगम उर्फ मुन्नी मो. लतिफ ( 45, रा. इराणी झोपडपट्टी) यांचा समावेश आहे.