आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची सुरक्षितता वार्‍यावर..?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील एकूण तीन शासकीय वसतिगृहांपैकी दोन ठिकाणी कंत्राटी तर एका ठिकाणी खासगी चौकीदार नियुक्त आहे. त्यामुळे या वसतिगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तीन वसतिगृहांमध्ये समाजकल्याण विभागाचे एक तर आदिवासी विभागाच्या दोन वसतिगृहांचा समावेश आहे. येथील शासकीय वसतिगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी चौकीदार नसल्याने मुलींची सुरक्षितता वार्‍यावर आली आहे.

मागासवर्गीय मुला-मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याकरिता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू केलेली आहेत. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईने वसतिगृहातील समस्या वाढल्या आहेत. या वसतिगृहांमध्ये गृहपालाशिवाय कोणतीही जबाबदार व्यक्ती नसल्याने या मुलींच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रामदासपेठेत असलेल्या समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये 75 मुली असून, येथे एका खोलीमध्ये पाच ते सहा मुली राहतात.

या वसतिगृहात 1970 मध्ये सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार एक गृहपाल, एक शिपाई, एक चौकीदार आणि एक स्वयंपाकी अशी पदे आहेत. मात्र, आज या वसतिगृहांमध्ये गृहपाल आणि शिपाई हीच पदे आहेत. चौकीदार हे पद आवश्यक असताना, गृहपालांना चौकीदाराची वेगळी व्यवस्था करावी लागत आहे. त्यासाठी त्यांनी खासगी चौकीदार नियुक्त केला आहे. हा एकच चौकीदार दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी काम करत आहे.

शहरांमध्ये आदिवासी मुलींची दोन शासकीय वसतिगृहे आहेत. त्यापैकी शास्त्रीनगरमध्ये असलेल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये 75 विद्यार्थिनी राहतात. या वसतिगृहामध्ये 17 खोल्या आहेत. प्रत्येकी एका खोलीमध्ये चार ते पाच मुली राहतात. येथे सुरक्षेसाठी एका चौकीदाराची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे. लहान उमरीत असलेल्या दुसर्‍या वसतिगृहामध्ये 125 मुली राहत असून, येथेसुद्धा एकच चौकीदार आहे.

तोसुद्धा कंत्राटी आहे. सध्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एवढय़ा मोठय़ा संख्येत एकाच ठिकाणी राहणार्‍या मुलींच्या सुरक्षेबाबत शासनाची उदासीनता दिसून येत आहे.

सध्या राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर 374 वसतिगृहे सुरू असून, त्याचा एकूण 32,190 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. या वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतात, त्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे लागते, तर आठवीनंतरच्या शिक्षणासाठी वसतिगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मोफत निवास व भोजन, अंथरूण -पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा, दोन गणवेश, शिक्षणाचे साहित्य आणि दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता म्हणून 600 रुपये देण्यात येतो.

पहिल्या बुधवारी अदालत व्हावी
आगार व्यवस्थापकांनी महिन्याच्या पहिल्या बुधवारी प्रवासी अदालत घेतली, तर प्रवासी आपल्या समस्या मांडू शकतील. भरत पाटील, कौलखेड.

प्रवासी अदालत नियमित व्हावी
बसची स्थिती दिवसेंदिवस घसरत चालली आहे. बसस्थानकावरही कुणीही ऐकायला तयार नसतो. प्रवासी अदालत नियमित झाली, तर समस्या मांडल्या जाऊ शकतात. संतोष पाटील, गोनापूर.

प्रवासी अदालत नामशेष
महामंडळाने सुरू केलेला प्रवासी अदालत हा उपक्रम स्तुत्य आहे. काही वर्षांपूर्वी हा उपक्रम राबवला जात होता. मात्र, कालांतराने तो बंद पडला आहे. ए. के. इंगळे,आगार व्यवस्थापक क्रं. 2 रा.प. अकोला

खासगी, कंत्राटी चौकीदारावर सुरक्षेची जबाबदारी
अकोला शहरामध्ये मुलींची तीन वसतिगृहे आहेत. या तीनही वसतिगृहांमध्ये एकूण 275 मुली राहतात. त्यात मागासवर्गीय मुलींचे एक वसतिगृह आहे. यामध्ये 75 मुली राहतात. येथे चौकीदाराचे पद असताना प्रत्यक्षात येथे चौकीदार मात्र नाही. खासगी चौकीदारावर येथील सुरक्षेची जबाबदारी आहे. आदिवासी मुलींचे दोन वसतिगृहे आहेत. शास्त्रीनगर येथील वसतिगृहात 75 मुली राहतात, तिथे एक चौकीदार, तर उमरीतील वसतिगृहात 125 मुलींच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने एकच चौकीदार कार्यरत आहे. सुरक्षेसाठी चौकीदारांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

मुलींच्या सुरक्षेबाबत दक्षता
या सर्व स्वत:च्याच मुली आहेत, या भावनेनेच मी काम करते. एक दिवसा आणि एक रात्रीसाठी स्वतंत्र चौकीदार असल्यास बरे होईल. सर्वच मुलींची त्या कशासाठी बाहेर जाणार आहेत म्हणून स्वतंत्र नोंद घेतली जाते. व्ही. बी. कुळकर्णी, गृहपाल, शासकीय मुलींचे वसतिगृह,अकोला