आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतात मुलींना विकणारी टोटी गजाआड.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिला लग्न किंवा अनैतिक व्यापारासाठी पळवून नेल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

वाशिम बायपास परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीच्या कुटंबाने तिचा विवाह राजस्थानमधील जोधपूरच्या एका युवकाशी तीन महिलांच्या मध्यस्थीने निश्चित केला. शनिवारी संध्याकाळी ही मुलगी आजीसोबत गांधी रोडवर खरेदीसाठी आली. मुलीच्या हाताला मेहंदी लावली होती. मुलीच्या आजीजवळ नवीन कपड्यांसह विवाहासाठी लागणारे काही साहित्य होते. पोलिसांनी गांधी रोडवरून या मुलीसह तिच्या आजीला चौकशीसाठी कोतवालीत ताब्यात घेतले.

चौकशीअंती पोलिसांनी वासुदेव लालराम सेन (वय 22), सुरंदर पन्नालाल गेहलोत (वय 40), लाल मुलाराम (वय 45) नरेंद्र चोथमल (नायक) (वय 24), रुकय्या बेगम मजिद कान (वय 60), बानो हनिफ खान (वय 40, सर्व रा. जालोरी, जिल्हा जोधपूर), सायरा बी शेख समत, सुनीता बंडू दामोदर (वय 35 रा. हरिहरपेठ), लक्ष्मीबाई गोविंद शिंधो (वय 62 रा. रमाबाईनगर, हरिहरपेठ), उज्‍जवला विष्णू तायडे (वय 35, रा. अंबिकानगर), गीता दमोदर इंगळे (वय 70, गौतमनगर), सुशीला किसन तेलगोटे (वय. रा. अंबिकानगर) आणि शहनाज बेगम उर्फ मुन्नी मो. लतिफ ( 45, रा. इराणी झोपडपट्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई एपीआय अजय जोगदंड, एपीआय शुभांगी दिवेकर, राजेंद्र डोंगरे, श्याम शर्मा आदींनी केली. आरोपींकडून अँड. पप्पू मोरवाल यांनी युक्तिवाद केला.