आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅपद्वारे मिळणार रक्तदाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मारवाडी युवा मंचच्या वतीने २४ तास रक्तदाते उपलब्ध करून देण्याची सेवा अकोल्यात सुरू केली. याच पार्श्वभूमीवर आपल्या शहरापासून किलोमीटर अंतरावरील युवा मंचचे सदस्यांचे ब्लड ग्रुप, त्यांची माहिती लोकांना थेट व्हावी, यासाठी एक मोबाइल अॅप तयार करण्यात येत आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांत हे अॅप लाँच करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली येथील रवी अग्रवाल यांनी दिली.
शनिवार, जुलै रोजी हॉटेल रायजिंग सन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. युवा मंचच्या वतीने देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. सध्या २४ राज्यांत ७०० पेक्षा अधिक शाळा कार्यरत आहे. या शाखांच्या माध्यमातून समाजात वेळोवेळी नानाविध उपक्रम घेतले जातात. युवा मंचने सुरू केलेल्या अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. या अॅम्ब्युलन्स सेवेबाबतीत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नंतर मारवाडी युवा मंचचा क्रमांक आहे. याशिवाय कॅन्सरच्या प्राथमिक तपासणी करणारी मोबाइल व्हॅनदेखील सुरू करण्याचा मंचचा मानस आहे. येत्या काही महिन्यांत या चालत्याफिरत्या कॅन्सर तपासणी करणाऱ्या तसेच त्यावर प्राथमिक उपचार करणाऱ्या दवाखान्याचे शुभारंभ होणार आहे.

राष्ट्रीय एकता विकास हे मंचचे ध्येय असून, युवा घडवण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात येणार आहे. व्यक्तीचा विकास झाला, तरच समाजाचा विकास होऊ शकतो, या विचाराने राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याशिवाय सध्या मंचचे अमृतधारा योजना, आपत्ती व्यवस्थापन योजना यांसह अनेक योजना सुरू आहेत. येत्या महिन्यांत महाराष्ट्रात १०० शाखा सुरू करण्यात येणार असून, जवळपास हजार सदस्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती रवी अग्रवाल यांनी दिली. या वेळी माजी अध्यक्ष इचलकरंजी येथील ओमप्रकाश पाटणी, अकोला प्रांताध्यक्ष निकेश गुप्ता, उडिया येथील रिंकू अग्रवाल यांच्यासह मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.