आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील मतदान केंद्रात माहिती करून घ्या अपडेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे अद्ययावतीकरण, प्रमाणीकरण करण्यासाठी २८ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे
.
कार्यक्रमांतर्गत मतदाराच्या छायाचित्रासह मतदान ओळखपत्रातील माहिती आधार कार्डमधील माहिती पडताळणी करून आधार कार्डचा क्रमांक मतदार यादीमध्ये समाविष्ट करावयाचा आहे. मतदारांचा मोबाइल क्रमांक, ई-मेल पत्तासुद्धा मतदार यादीमध्ये नमूद करावयाचा आहे. जिल्ह्यात सर्व मतदार नोंदणी अधिकारी, साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे. हा कार्यक्रम अधिक यशस्वी होण्याच्या दृष्टीने आयोगाद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदार स्वत: भारत निवडणूक आयोगाच्या वेब साइटवर आपली स्वत:ची, कुटुंबातील सदस्यांची मतदार यादीतील माहिती, आधार कार्ड क्रमांक, निवडणूक ओळखपत्र क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी तपशील अद्ययावत करू शकतील. कार्यक्रमांतर्गत मतदाराच्या छायाचित्रासह मतदान ओळखपत्रातील माहिती आधार कार्डमधील माहिती पडताळणी करता येईल. आधार कार्डचा क्रमांक मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येईल.

यादीतील मतदारांच्या नावासंबंधातील तपशील अद्ययावत करणे, आधार कार्डमधील माहिती आधार कार्डमध्ये समाविष्ट करणे, ई-मेल, संपूर्ण पत्ता, मोबाइल क्रमांक इत्यादी तपशील मतदार यादीत नमूद करणे या मतदारांशी संबंधित महत्त्वाच्या बाबी असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शाळा, महाविद्यालयांचे प्रतिनिधी तसेच सर्व मतदार यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांना केले आहे.

हेल्पलाइनवर साधावा संपर्क
{वेबसाइट- eci.nic.in {एसएमएस सुविधा - 51969
टोल फ्री - 1950 वर माहिती घेता येईल.

अधिकारी येणार "आपल्या दारी'
मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी प्रस्तुत माहिती प्राप्त करण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती प्राप्त करतील. केंद्रावरसुद्धा मतदार स्वत:ची माहिती देता येईल. राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी जागृती गट स्थापन करून त्यांच्याद्वारा माहिती प्राप्त करून घ्यायची आहे.
विविध संघटनांचे घेतले सहकार्य

मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी यांच्या क्षेत्रातील शासकीय कर्मचारी, स्थानीय संस्थांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते, मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक, मतदान केंद्राजवळील शाळा, महाविद्यालयांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, राजकीय नागरी सेवा संघाचे स्वयंसेवक यांच्याकडून सहकार्य घेण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...