आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय मिळाल्यास आत्मदहन करू, पीडित शिक्षिकांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- इकरा उर्दू शाळेचे सचिव मोहम्मद जाकिर याच्याकडून शारीरिक, मानसिक आर्थिक छळ केला जात होता. सीआर खराब करण्याच्या नावावर आमचे हनन झाले, असा आरोप इकरा शाळेच्या पीडित शिक्षिकांनी १३ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
जुने शहरात इकरा उर्दू प्राथमिक शाळा आहे. या शाळेत अनेक वर्षांपासून रफिया बी. अब्दुल नबी, शाहिन तलत मेहमूद खान, सलिया खातून युसूफ खान, रेशमा इजाजुल्ला खान, साजेदा अंजूम नूर खान, निकत जबीन मो. युसूफ, शबाना परवीन आलम खान कार्यरत आहेत. नोकरीवर लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये देणगी घेऊन या विनाअनुदानित शाळेवर शिक्षिका म्हणून काम करू लागलो. तेव्हापासून या ना त्या कारणाने सचिवाकडून अपमान करण्यात येत होता. मात्र, जेव्हा या शाळेला ६० टक्के शासकीय अनुदान मंजूर झाले, तेव्हापासून या सचिवाच्या अश्लील कारवाया सुरू झाल्या. लाखो रुपये घेऊन नव्या शिक्षिका भरतीचे डोहाळे याला लागले. ही शाळा सोडून जावी यासाठी सचिवाने अनेक अश्लील प्रकार सुरू केले. शाळेतील संगणकावर अश्लील चित्र दाखवणे, पाणी आणले असता हात दाबणे, अंगाला स्पर्श करणे, हिणवणे, अश्लील घाणेरडे बोलणे, सीआर खराब करणे आदी प्रकार सुरू केले.
एकीकडे शाळेची वेळ ही सकाळी ते दुपारी १२.३० ही असताना सचिव रात्रीपर्यंत शाळेत विनाकारण बसवून ठेवत असे. या विरोधात आवाज उचलला तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात होती. जानेवारी २०१४ पासून एकूण पगाराच्या केवळ २५ टक्केच वेतन सुरू झाले होते. मात्र, शाळेला अनुदान मिळताच आम्ही नको म्हणून अश्लीलतेचा या इसमाने कळस गाठला. त्यामुळे पीडित शिक्षिकांनी मे २०१५ रोजी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीपासून आम्हाला कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. शाळेचा सचिव मो. जाकिर, मो. नासिर, मो. राजीक, मो. सादिक, सै. फरहतउल्ला हे तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देत आहेत. त्रास देणारा मुख्य आरोपी मो. जाकिर याला तत्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा सात शिक्षिकांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...