आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनसाखळी चोरट्यांनी दिली कबुली, चार चोरीच्या घटनांचा केला खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मंगळसूत्र चोरणाऱ्यास सोमवारी रंगेहात अटक करण्यात आल्यानंतर चोरट्यांच्या टोळीपर्यंत पोहाेचण्यात पोलिसांना यश आले आहे. सहा जणांची टोळी असल्याचे उघड झाले असून, चार चोरीच्या घटनांची आरोपींनी कबुली दिली आहे, तर या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खदान पोलिसांनी सोमवारी उषा विजय पोरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकणारा आरोपी शेख मोहसीन शेख मेहबूब याला अटक केली. या आरोपीचा सोबती दुचाकीचालक समीर खान बशीर खान हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, त्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शेख मोहसीन शेख मेहबूब समीर खान बशीर खान याने गुन्ह्याची कबुली दिली असून, महिलेचे हिसकलेले मंगळसूत्र त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले आहे. १६ मे रोजी शिवणी येथील महिला सकाळी फिरायला गेली असता, तिला चाकू लावून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या सहा आरोपींची माहिती या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. तसेच त्यातही या दोघांचा समावेश आहे. बार्शिटाकळी रोडवर काही दिवसांपूर्वी एका जणास चोरट्यांनी लुटले होते. त्या गुन्ह्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे.

टोळीची सूत्रधार महिलाच
चोरीच्यासोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी या टोळीची प्रमुख महिला आहे. चोरीचे सोने परस्पर विकण्याचा तिचा धंदा आहे. पोलिस तिच्या मागावर असून, तिने घर सोडून पलायन केले आहे. पोलिस या महिलेचा शोध घेत असून, तिला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींची संख्या वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

राजकारण्यांचे दबावतंत्र
आरोपीचांगल्या वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी बघा. असा सल्ला शहरातील काही राजकीय नेत्यांनी आणि एका संस्थेतील विरोधी पक्ष नेत्याने खदान पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना भीक घालता आल्या पावली परत पाठवले.

रुग्णालयात जाणाऱ्या महिलेस लुटले : व्याळाते रिधोरादरम्यान गत आठवड्यात रात्री वाजताच्या सुमारास महिला पुरुष त्याच्या चिमुकल्याला घेऊन रुग्णालयात चालले होते. त्यांना याच आरोपींनी अडवले होते. त्यांना धमकावल्यानंतर त्या महिलेने आपल्या गळ्यातील, कानातील दागिने दिले होते.
बातम्या आणखी आहेत...