आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांचा मध्यस्थी पोलिस कोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - चोरीच्या गुन्ह्यातील सोने खरेदी-विक्री आणि जप्तीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन आरोपींची 13 नोव्हेंबरला पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. महावीर मिर्शीलाल वर्मा (वय 69, रा. काळामारोती रोड), जाकीर अली शहादत अली (वय 45, रा. मोहंमद अली चौकीच्या पाठीमागे) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यातील 406 ग्रॅम सोने सराफा व्यवसायाशी संबंधित असलेल्या मध्यस्थीला विकल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना 12 नोव्हेंबरला अटक केली होती.

बाळापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या नकाशी येथे मे महिन्यात घरफोडीची घटना घडली होती. चोरट्यांनी 239 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांवर हात साफ केले होते. चोरीच्या घटना येथेच थांबल्या नाहीत. त्यानंतर जुने शहर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणार्‍या गंगानगरातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याच्या घरात चोरी झाली होती. या घरातील 167 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी शेख जावेद शेख सत्तार, समद खान असद खान आणि शेख रफिक शेख बशीर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 9 नोव्हेंबरला अटक केली होती. आरोपींनी हे सोने दोघांना विकल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी महावीर मिर्शीलाल वर्मा (वय 69, रा. काळामारोती रोड), जाकीर अली शहादत अली (वय 45, रा. मोहंमद अली चौकीच्या पाठीमागे) चौकशी केली. चौकशीअंती या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी अटक केली होती.

सोने घेण्यासाठी दलाल सक्रिय
चोरीचे सोने विकत घेण्यासाठी काही सराफा व्यावसायिकांनी नवीन फंडा शोधून काढला आहे. चोरट्यांकडून स्वत: थेट सोने विकत घेतल्यास भविष्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतो, हे हेरून काही सराफा व्यावसायिकांनी सोने विकत घेण्यासाठी दलालांना सक्रिय केले. हे दलाल कधी कारागिराच्या रूपात असतात, तर कधी किरकोळ व्यावसायिकांच्या रूपात. एखाद्या वेळी गुन्हा उघडकीस आल्यास चोरटा थेट सोने विकत घेतलेल्या दलाल, मध्यस्थीकडे बोट दाखवतो. या दलाल आणि मध्यस्थींकडून सोने विकत घेणारा व्यावसायिक मात्र सुरक्षित राहतो. मात्र, कधी-कधी काही प्रामाणिक व्यावसायिकांनाही या दलालांमुळे नाहक त्रास होतो. त्यामुळे कारवाईपूर्वी पोलिसांनी नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

आरोपी पोलिस कोठडीत
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोने जप्तीप्रकरणी महावीर मिर्शीलाल वर्मा, जाकीर अली शहादत अली यांना 13 नोव्हेंबरला न्यायालयात हजर केले. आरोपींची 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख सुभाष माकोडे, हेडकॉन्स्टेबल शिवसिंग डाबेराव, मनोहर मोहोड, शेख हसन, शेख नईम, अन्वर खान पठाण करत आहेत.

वर्मांची चौकशी करू
महावीर वर्मा यांनी राजू वर्मा यांचे नाव घेतल्याने त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. जबाबमध्ये प्रत्येकाचीच चौकशी करण्यात येईल. ’’ सुभाष माकोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक

व्यवहाराशी संबंध नाही
पोलिस दबाव तंत्राचा वापर करून खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कोणाकडूनही चोरीचे सोने विकत घेतलेले नाही. त्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही.’’ राजू वर्मा, जिल्हाध्यक्ष सराफा असोसिएशन, अकोला.

काय झाले बैठकीत : पोलिसांनी सोने जप्तीप्रकरणी महावीर वर्मांसह तिघांना ताब्यात घेतल्याने 12 नोव्हेंबरला सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात धाव घेतली. या वेळी महावीर वर्मा यांनी सोने घेतल्याचे सांगत राजू वर्मा यांच्याकडे बोट दाखवले. त्यामुळे पोलिसांच्याही भुवया