आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ, सदस्य नोंदणीसाठी आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने तीन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मिळाले आहे. कामगार व विशेष साहाय्य मंत्रालयाकडून राज्यघटनेला 23 ऑक्टोबर रोजी पत्र प्राप्त झाले. या पत्रात केंद्र शासनाच्या असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 मधील तरतुदीनुसार कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. कामगारांसोबत अधिनियमाच्या व्याख्येनुसार वृत्तपत्र विक्रेत्यांना सामावून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बी. संतोषकुमार यांनी केले आहे.

अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेते सेवारत असून, त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही. कल्याणकारी मंडळाद्वारे त्यांना भविष्य निर्वाह निधी, अपघात, अंत्यसंस्कार साहाय्य, मुलांसाठी शिक्षण सुविधा, आवास योजना, वृद्धापकाळातील निवारा आदींचा लाभ मिळवण्यासाठी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सरचिटणीस सुनील पाटणकर, बालाजी पवार, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मारोती नवलाई, राधेश्याम शुक्ला यांनी मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा केला, असे जिल्हा सचिव अनिल पावडे यांनी कळवले आहे.