आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या योजनांची अॅलर्जी, वाढत्या लोकसं‌ख्येमुळे वाहतुकीची समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाराष्ट्रातसर्वात प्रथम स्काय बस सुरू करण्याच्या मानापासून अकोला शहराला वंचित राहावे लागू शकते. पदाधिकारी-प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी झाला असताना कोणतीही कार्यवाही झाली नाही. दुसरीकडे शहर बस वाहतुक सेवाही ठप्प झालेली असताना किमान ही योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, अशी भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे वाहन रस्त्यावर आणणे अवघड झाले आहे. ही समस्या केवळ मुंबई, दिल्ली आदी मेट्रो सिटींपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या समस्येने अकोला शहरांसारख्या लहान मध्यम शहरांनाही घेरले आहे. त्यामुळे जमिनीऐवजी जमिनीच्यावर वाहतुकीचे नवनवीन प्रयोग सुरू झाले आहेत. देशात मेट्रो शहरांमध्ये मेट्रो मोनो रेलचा वापर सुरू झाला आहे. याच धर्तीवर लहान मध्यम शहरांसाठी स्काय बसचा वापर जवळपास ५० देशांनी सुरू केला आहे. भारतात अद्याप ही स्काय बस सेवा सुरू झाली नसली, तरी अमृतसर, नोएडा या शहरांमध्ये या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

गणेश इनोवेशन अकोला या कंपनीने या अनुषंगाने स्काय बसचा प्राथमिक अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिकेच्या महासभेत साडेतीन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा रेल्वेस्थानक ते मदनलाल धिंग्रा चौक (बसस्थानक) या १.६ किलोमीटरच्या मार्गावर राबवली जाणार आहे. कंपनी या योजनेच्या उभारणीचा संपूर्ण खर्च स्वत: करणार आहे. त्यामुळे महापालिकेला ही योजना चालवण्यासाठी कोणताही खर्च नाही. या योजनेला साडेतीन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली, परंतु प्रशासनाने पुढील कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाला केवळ निविदा बोलावण्याचे काम करायचे आहे, परंतु अद्याप प्रशासनाने निविदा बोलावण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

सत्ताधारी उदासीन
भारिप-बमसंनेस्काय बसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु, सत्ताधारी गटाने प्रशासनासोबत याविषयी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाला योजना नको आहेत का? असा प्रश्न पडला आहे.
गजानन गवई,गटनेते,भारिप-बमसं. महापालिका अकोला.
कार्यवाही नाही
स्कायबसचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला. महासभेत प्रस्तावही मंजूर झाला, परंतु अद्याप पुढील कोणतीही कार्यवाही महापालिकेने केली नाही. त्यामुळे कंपनीला पुढील कार्यवाही करता येत नाही. {बी. एस.देशमुख, संचालक,गणेश इनोवेशन, अकोला
प्रशासनाशी चर्चा करू
यापूर्वीहीप्रशासनाशी स्काय बसबाबत चर्चा केली आहे. तूर्तास कामकाज प्रभारी आयुक्तांकडे आहे. त्यामुळे उपायुक्त रुजू झाल्यानंतर स्काय बसच्या प्रस्तावावर चर्चा करू. योजना मनपाच्या हातून जाणार नाही, या साठी प्रयत्न करू. {विनोद मापारी,उपमहापौर