आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या कामासाठी पाठीवर थाप हवीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - समाजाने चांगली कामे करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी पूर्वजांची शिकवण असल्याने काम करणार्‍यांच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे केले.

आमदार राहुल बोंद्रेंच्या कामाची दखल घेत लोकसहभागातून नदी खोलीकरण व जिल्हा परिषद शाळेत गरूडझेप प्रकल्पाच्या माध्यमातून ई शिक्षणासारखी संकल्पना प्रत्यक्ष राबवून आमदार बोंद्रे हे शिव-शाहूंना अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. चिखली येथे आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा व शिवाजी उद्यान सौंदर्यीकरण कामाच्या लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सोमवारी झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल बोंद्रे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार अमित झनक, माजी आमदार बाबुराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे, नगराध्यक्षा शोभा सवडतकर, भगवान भोंडे, दिनदयाल वाधवाणी, रामभाऊ जाधव, निसार चौधरी, अरविंद देशमुख, डॉ. सत्येंद्र भुसारी, भगवान काळे, सिद्धेश्वर इंगळे, मोहम्मद आसिफ, पप्पूसेठ हरलालका, अरुणा कदम, दीपक लहाने, राणा सुनीलकुमार सुरडकर, दीपक देशमाने, करूणा बोंद्रे, संगिता गाडेकर, सुनिता शिंगणे, कुणाल बोंद्रे, नंदकिशोर सवडतकर, माणिक जाधव, दादूसेठ, भानुदास घुबे, रामदास मोरे, डॉ. प्रकाश शिंगणे, अंकुशराव वाघ, सुधाकरराव धमक, रवि तोडकर, प्रदीप पचेरवाल, रमेश सुरडकर, किशोर साखरे, डॉ. किशोर सास्ते उपस्थित होते.

शिव-शाहू यात्रेनिमित्त राज्यभरात बहुजन समाजाच्या समस्या जाणून घेत, त्यांना एकत्रित घेऊन समस्या निवारणाचे काम हाती घेतले आहे. प्रसंगी चिखली दौर्‍यात आमदार राहूल बोंद्रे यांना छत्रपती शवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाची चर्चा केली असता, आमदार बोंद्रेंनी शब्द पाळले व आज पूर्ण करून दाखवले. यामुळे कामे करणार्‍यांच्या पाठीशी आपण उभे राहले पाहिजे. त्यांना ताकद द्या, असे आवाहन त्यांनी केले. आमदार बोंद्रेंचे काम पाहिले असता, लोकवर्गणीतून नदी खोलीकरण करून पाणी अडवून शेतकरी समृद्ध करण्याकामी व सरकारी शाळेतील मुलांना लोकवर्गणीच्या माध्यमातून ई-शिक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. कोल्हापूरवरून या कार्यक्रमासाठी येणे ही माझी जबाबदारीच होती असेही ते म्हणाले.

आमदार बोंद्रे म्हणाले, छत्रपतींना दिलेला शब्द आपण अल्पावधीत पूर्ण करू शकलो याचा आनंद होत आहे. याप्रसंगी आमदार अमित झनक, विजय अंभोरे, माजी आमदार बाबुराव पाटील, प्रा यशवंत गोसावी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले. संचालन अजिम नवाज राही यांनी, तर आभार नंदकिशोर सवडतकर यांनी मानले.
चांदीच्या रथावरील मिरवणूक आकर्षण
चांदीच्या रथावरून निघालेली छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक आकर्षण ठरली होती. राजेशाही थाटात झालेल्या कार्यक्रमानंतर मौनी महाराजांच्या पावन मठामध्ये आयोजित सभेला छत्रपती संभाजी राजे यांनी मार्गर्शन केले.