आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायभूमीचे पांग फेडणार : पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्याच्या सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून आरोग्य, शिक्षण, संरक्षण, मूलभूत सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देत अाहे. ही सर्व महत्त्वपूर्ण कामे तडीस नेणार असल्याचे सांगत माय भूचे पांग फेडण्यासाठी जीवाचे रान करेल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

अापल्या मागील १०० दिवसांचा लेखाजोगा डॉ. रणजित पाटील यांनी १८ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत मांडला. या वेळी आमदार हरीश पिंपळे, गोपीकिशन बाजोरिया, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, भाजप शहर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते. जिल्ह्याचा प्रलंबित असलेला पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न तसेच मुलामुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तीन मजली अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परीक्षा हॉल, प्रयोगशाळा, अंतर्वासिता निवासी वसतिगृह, मुलांचे वसतिगृह तसेच २१० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, बोरगावमंजू येथे ग्रामीण रुग्णालय, पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथे ग्रामीण रुग्णालय यासारखे जनतेशी निगडित असलेल्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला लागून असलेल्या शिवापूर शिवारात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच कॅन्सर हॉस्पिटल टी. बी. हॉस्पिटल करण्यात येणार आहे. ४.९९ कोटी रुपयांचा शहरातील सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पर्यटनावरभर
अकोलाशहरापासून काही अंतरावर असलेल्या कापशी तलाव येथे पर्यटन केंद्रासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून ९६.२२ लक्ष पर्यटन विकास महामंडळाकडून ६५ लक्ष ,असे कोटी ६१ लक्ष मंजूर झाले आहेत. लवकरच पर्यटन केंद्र म्हणून शहरातील जनतेसाठी कापशी तलाव सज्ज होणार आहे.

गृह विभागातही भरीव कामगिरी : ८००कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही प्रकल्प मंजूर करून मुंबई, पुणे येथे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रणाली विकसित करण्याला मान्यता मिळवली. पोलिसांच्या बदल्यांचे अधिकारात विकेंद्रीकरण आणण्यासाठी प्रयत्न केले. नाशिक कोल्हापूरला नवीन न्याय सहायक प्रयोगशाळा तसेच प्रत्येक जिल्ह्याला युनिट स्थापन केले जाणार आहे. पोलिसांना घरे मिळावी यासाठी एफएसआय वर वाढवला. प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांविरुद्धचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष सेलची स्थापना केली.

दुग्ध गंगा आणणार
दुधाअभावीबंद असलेली शासकीय दूध योजना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडे नॅशलनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून साहाय्य प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

शहराचाही हाेणार कायापालट
काेट्यवधींचीप्रस्तावित भूमिगत गटार योजना तांत्रिक मान्यतेकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठवण्यात आली असून, प्रस्तावित रकमेपैकी ७६ कोटी रुपये मनपाकडे जमा आहेत. लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. महान जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य झालेली पंपिंग मशीन बदलवण्याकरिता शासनाकडून आकस्मिक योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून कोटी ६० लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते सीआरएफ अंतर्गत तयार करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.