आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपी ठाकरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ठाकरे यांनी मुख्यमंत्री, महसुलमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला)
अकोला- महापालिकेचे अपक्ष नगरसेवक तथा माजी भाजप कार्यकर्ता गोपी ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे शहरासह जिल्ह्यात भाजपला ओबीसी स्वरूपात अधिक बळकटी मिळाली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
मुख्यमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गोपी ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. मुख्यमंत्र्यांनी गोपी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गोपी ठाकरे भाजपपासून दूर गेले होते, तरी अप्रत्यक्षरीत्या ते भाजपचेच काम करत होते. महापालिकेच्या निवडणुकीत विदर्भातून ओबीसी प्रवर्गातून सर्वाधिक मताधिक्क्याने नगरसेवक म्हणून निवडून आलेले गोपी ठाकरे यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी असून, एक सच्चा कार्यकर्ता परत आल्याचा आनंद झाल्याचे एकनाथ खडसे यांनी याप्रसंगी बोलून दाखवले.
तसेच गोपी ठाकरे यांचे सामाजिक कार्य लोकोपयोगी असल्याचेही याप्रसंगी डॉ. रणजित पाटील म्हणाले. गोपी ठाकरे यांनी भाजपकरिता तन-मनाने पूर्ण काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी राजू टाकळकर, प्रवीण देशपांडे, बंडू पंचभाई आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...