आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय निधीतील कामांची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी विचार मांडले. )
अकोला-शासकीय निधीतून झालेल्या प्रत्येक योजनेच्या कामांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात येईल. कोणत्याही कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी आपल्या गावातील कामावर नियंत्रण ठेवून निकृष्ट दर्जाच्या कामांची थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जी. श्रीकांत यांनी पहिल्यांदाच पत्रकारांसोबत संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २२ जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी पुत्र असलेल्या जिल्हाधिकांनी आदर्श ग्राम, जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण विकास युवकांची उन्नती साधणे ही महत्त्वाची उद्दिष्टे ठेवत आगामी काळात महत्त्वाचे प्रोजेक्ट हाती घेतले असल्याचे सांगितले. शासनाचा जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्कांक्षी प्रकल्प असून, ‘एक खातेदार एक शेततळे’ यासाठी नियोजन करण्याचे आवाहन कृषी, महसूल अधिकांना करण्यात आले. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ तहसीलदार कार्यालयासह शासनाच्या विविध विभागांवर त्यांनी प्रकाश टाकला. महापालिका जिल्हा परिषदेशी जरी प्रत्यक्ष संबंध नसला, तरी नागरिकांचे हित लक्षात घेता प्रशासनाला योग्य दिशा देण्याचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. अभियान सुरू होऊन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला, तरी अद्याप जिल्ह्यातील केवळ ४५ टक्के गावांत शौचालये आहेत. जनता उघड्यावर शौचास बसते, ही आपल्यासाठी अपमानास्पद बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात शौचालय बांधून घेण्यासाठी जातीने लक्ष देणार आहे. या पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.

ऑलवेज वेलकम
नागरिककार्यालयीन वेळेत मला भेटायला केव्हाही येऊ शकतात. दौवर असलो तर नागरिकांनी काम कागदावर लिहून स्वीय सहायकांकडे द्यावे, निश्चित त्याचे निराकरण केले जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी विचार मांडले.
४५ टक्के गावांतशौचालये आहेत. जनता उघड्यावर शौचास बसते, ही शरमेची बाब असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सिंचन विहिरीच्या कामांना वेग देणार
महात्मागांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धडक सिंचन विहिरींच्या कामांना गती देणार आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध होत असल्यामुळे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला गती देऊन धडक विहिरीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकांना यानिमित्ताने त्यांनी दिलेत.

गौण खनिज चोरट्यांवरही वचक
जिल्ह्यामध्येनाला, नदीपात्रातून होणा गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी पथक नेमून कारवाईचे सत्र राबवणार आहे. यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे चोरट्यांवर वचक राहील.

अकोल्यात शैक्षणिक हब तयार करणार
शिक्षणक्षेत्रात विदर्भाची राजधानी म्हणून अकोल्याची ओळख निर्माण करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न असतील. दर महिन्याच्या तारखेला जिल्हाधिकांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

अकोल्याला स्मार्ट सिटी बनवणार
‘मनपाच्याकार्यपद्धतीविषयी दिवसभर बोलले तरी कमी आहे,’ असा टोला लगावत अकोल्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आयुक्तांना सोबत घेऊन प्रयत्न करू. वायफाय सुविधा प्रत्येक भागात पुरवणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

घुसर पॅटर्न जिल्ह्यात राबवण्यात येणार
जलयुक्तशिवार योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील घुसर येथे १०० शेततळे तयार झाले आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने चांगले काम झाले आहे. अशाच प्रकारचे काम जिल्ह्यातील इतर गावांमध्ये करून लोकसहभागातून नदीचे पात्र खोलीकरण, रुंदीकरण गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून निश्चितच पाण्याच्या पातळीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...