आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Industrial Training Institutes,Latest News In Divya Marathi

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था: सर्व्हर डाउन; प्रवेश प्रक्रिया ‘हँग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशाची पहिली यादी सोमवारी सकाळी 8 वाजता संकेतस्थळावर सुधारित गुणवत्ता यादी, वैधानिक व समांतर आरक्षणावर आधारित संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी जाहीर झाली. मात्र, सकाळी 11 वाजेपासून वेबसाइटचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्जदारांना वाट पाहावी लागली. सायंकाळी 4 वाजता संस्थेच्या कार्यालयात यादी लावण्यात आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रकारामुळे अर्जदारांचा खोळंबा झाला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यांतर्गत औद्योगिक प्रशिक्षणाच्या एक व दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचे www.dvetadmission.in या संकेतस्थळावर 8 जुलैपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मुला व मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी सकाळपासूनच अर्जदारांनी गर्दी केली होती. सुधारित गुणवत्ता यादीतील क्रमांक अर्जदारांना मिळाला. मात्र, संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी न समजल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली. सर्व्हर पूर्ववत सुरू झाल्यानंतर संस्था व व्यवसायनिहाय पत्र पाहता आले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. 31 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया होणार असून, 1 ऑगस्टला दुसरी यादी जाहीर होईल.