आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. हुसैनी यांच्यावरील कारवाई रोखण्यासाठी आता मनधरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तक्रारकर्त्या विद्यार्थिनीवर तक्रार मागे घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील काही वरिष्ठ प्राध्यापकांकडून दबाव टाकल्या जात आहे, तर विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तणूक करणारे न्यायवैद्यक शास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. एस. एन. के. हुसैनी यांच्यावर होणारी कारवाई रोखण्यासाठी महाविद्यालयातील काही वरिष्ठ प्राध्यापकांनी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांची मनधरणी सुरू केल्याची वास्तविकता आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेला सहा दिवस उलटले तरी महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. डॉ. हुसैनीवर कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी काही वरिष्ठ प्राध्यापक पुढाकार घेत असल्याची माहिती प्राप्त झाली. डॉ. हुसैनी हे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्याशी नेहमी काम पडते. याच संधीचा फायदा घेत डॉ. हुसैनी हे विद्यार्थ्यांची भावनिक अडवणूक करत आले आहेत. याबाबत बरेचदा अधिष्ठातांपर्यंत तक्रारही झाली. मात्र, आपला प्राध्यापक म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
10 महिन्यांपूर्वी दुचाकी जाळली : सहयोगी प्राध्यापक डॉ. हुसैनी यांच्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांची दुचाकी जाळली होती. हा प्रकार महाविद्यालयाच्या आवारात घडल्याने प्रकरण दडपण्यात आले. मात्र, अशाप्रकारे दुचाकी जाळून आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न प्राध्यापकाबाबतीत घडतो ही बाब चिंताजनकच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंटर्नशिपचा भत्ता अद्याप दिला नाही, एनएमसीच्या नावावर आर्थिक लूट होते. स्कॉलरशिपचे पैसे अजून मिळाले नाही, एकाच वर्गात द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाते, आदींसह विद्यार्थ्यांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत.
चौकशीचा देखावा कशासाठी?
आव्हाड यांनी दिलेला आदेश अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड मानत नसल्याचे दिसून येते. अद्याप त्यांनी चौकशी तर केलीच नाही, पण चौकशी समितीही नेमली नाही. ते दुहेरी भूमिका बजावत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड चीड

200 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत डॉ. हुसैनी यांची तक्रार करणार्‍या त्या विद्यार्थिनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न महाविद्यालयातीलच काही वरिष्ठ प्राध्यापकांकडून होत आहे. विद्यार्थिनीला होत असलेल्या त्रासाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी विद्यार्थिनीवर दबावाचा प्रयत्न