आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graduate Constituency Election, Latest News In Divya Marathi

मतदारांपर्यंत पोहोचण्यास लागणार उमेदवारांचा कस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या विद्यमान सदस्यांची मुदत संपण्यापूर्वीच 20 जून रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक उन्हाळी सुट्यांमध्ये आली आहे. पाच जिल्ह्यां मिळून बनलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी शिक्षकांपर्यंत पोहोचताना मात्र उमेदवारांचा कस लागणार आहे.
20 मे रोजी शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली. शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांची मुदत 19 जुलै रोजी संपत आहे. निवडणुका उन्हाळय़ाच्या सुटीमध्ये आल्या आहेत. प्रत्येक वेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक ा शालेय सत्रामध्ये आल्यामुळे शिक्षक उमेदवारांना प्रचार करण्यासाठी शिक्षकांच्या घरोघरी जाण्याची आवश्यकता पडली नाही. या वेळी शिक्षकांना सुट्या असल्यामुळे उमेदवारांना मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी शिक्षकांच्या दारोदार जावे लागणार आहे. चार लोकसभा क्षेत्र मिळून अमरावती शिक्षक मतदारसंघ आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये फिरताना शिक्षकांच्या भेटी घेणे उमेदवारांना शक्य होणार नाही. असे असले, तरी निवडणुकीपूर्वीच अनेक शिक्षक संघटनांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तसा प्रचारही त्यांनी केला आहे. मात्र असे असताना ज्या उमेदवारांकडे हायटेक प्रचार यंत्रणा आहे. त्यांना प्रचाराची अडचण नसून, ज्यांच्याकडे तोकडी व्यवस्था आहे, त्या उमेदवारांचा मात्र शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यास कस लागणार आहे.
कॉग्रेसकडून तायडे ?
कॉग्रेस उमेदवार म्हणून प्रकाश तायडे यांच्या नावावर सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कॉग्रेस गोटातून व्यक्त होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारांशी मुंबईत चर्चा केली.