आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'एफसीआय\'च्या गोदामामध्ये 60 क्विंटल धान्याचा अपहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भारतीयखाद्य महामंडळाच्या (एफसीआय) विलासनगरातील गोदामात सुमारे 60 क्विंटल धान्याचा अपहार हुडकून काढण्यात आला आहे. पुरवठा विभागाचे उपायुक्त माधव चिमाजी यांनी हा अपहार उघड केला असून, गोदामरक्षक एस. डी. खडगे त्यासाठी जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
फिरत्या तपासणीदरम्यान चिमाजी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी या गोदामाला भेट दिली होती. त्यावेळी अन्न-धान्याची पोती अस्तव्यस्त असणे, त्यावर वजनाची नोंद नसणे, साठा वहीत योग्य त्या नोंदी नसणे आदी अनियमितता दिसून आल्या होत्या. सकृतदर्शनीच हा घोटाळ्याचा प्रकार असल्याचे चिमाजी यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तशी माहिती आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना दिली होती. दरम्यानच्या काळात संपूर्ण तपासणीची मोहीम हाती घेऊन गोदामातील धान्याची मोजदाद सुरू केली गेली. तब्बल १२ दिवस चाललेली ही मोजदाद सोमवारी (दि. २९) संपुष्टात आली.

मोजदादअंती गोदामातील एकूण धान्यापैकी ३९ क्विंटल तांदूळ, १९ क्विंटल गहू एक क्विंटल ५४ किलो साखर गायब असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा कोणताही समाधानकारक खुलासा खडगे यांच्यामार्फत दिला गेला नाही. त्यामुळे हा अपहाराचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबतचा संपूर्ण अहवाल आयुक्तांना सोपवण्यात आला असून, त्यांच्या िनर्देशानुसार संबंिधत दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
कारवाई निश्चितच
गोदामातीलया अपहारप्रकरणी निपयमानुसार गोदामरक्षक त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. प्रकरणाचे गांभीर्य आयुक्तांना सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना आज दुपारनंतर मुंबईला जावे लागले. तेथून परत येईपर्यंत कारवाईचे स्वरूप ठरलेले असेल. माधविचमाजी, उपायुक्त(पुरवठा), अमरावती
मीअपहार केला नाही
मोजदादअंतीअपहार झाल्याचे उपायुक्तांचे म्हणणे असले तरी मी कोणताही अपहार केला नाही. धान्य का कमी भरले, याला अनेक कारणे आहेत.शिवाय नियमित प्रक्रियेचाच तो एक भाग आहे. याप्रकरणी योग्य वेळी योग्य खुलासा केला जाईल. एस.डी. खडगे, गोदामरक्षक,अमरावती.