आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदामातील धान्य नासाडीकडे नियंत्रण अधिकार्‍यांचा कानाडोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सरकारी गोदामातील धान्याच्या नासाडीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील संबंधित नियंत्रण अधिकारी कानाडोळा करत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांना कर्मचार्‍यांनी गोदामातील अन्नधान्याच्या नासाडीबाबत माहिती दिली नाही. पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांच्याकडून साहेबांना अंधारात ठेवले जात आहे. विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांना साखर, गहू आदी धान्य पुरवण्याची जबाबदारी याच गोदाम व्यवस्थापकाकडे असते. गोदाम व्यवस्थापक व गोदामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पुरवठा विभागात कार्यरत अधिकार्‍यांची असते. गोदामात धान्याची नासाडी होत असताना एकाही अधिकार्‍याच्या निदर्शनास हा प्रकार कसा आला नाही, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घ्यावी :
जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या पुरवठा नियंत्रण अधिकार्‍यांनी किती वेळा गोदामाला भेट दिली, याचीही माहिती जिल्हाधिकार्‍यांनी घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारची धान्याची होत असलेली नासाडी हा चिंतनाचा विषय आहे. एकीकडे ठेकेदारामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा वेळेवर केला जात नाही, तर दुसरीकडे रेशन दुकानदारांमार्फत धान्य आलेच नाही, असे गरीब लाभार्थ्यांना सांगितले जाते.