आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-प्रशासन
अकोला- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यापासून या प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. तसेच तहसील कार्यालयातील गर्दी टळली असली, तरी प्रत्येक गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने अशा गावांतील उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने २३ जून उर्वरितपान. १० रोजीजाहीर केला. पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील हजार ७७९ सार्वत्रिक ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २५ जुलै रोजी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यांत २३ जिल्ह्यांतील हजार १९ सार्वत्रिक हजार २१२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत म्हटली की, गावातील लहान-सहान लोकप्रतिनिधी निवडणूक लढवण्यासाठी तयार असतात. निवडणूक नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशनपत्रे देण्यासाठी उमेदवार तहसील कार्यालयात आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी आपले कार्यकर्ते सोबत घेऊन येतात. प्रसंगी शांतता, सुरक्षितता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रकार टाळण्यासाठी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ही प्रक्रिया शासनाला अत्यंत सोयीची ठरणार आहे. मात्र, काही उमेदवारांना निश्चित अडचणीची ठरू शकते.
हमीपत्र आवश्यक :
उमेदवारांकडूनराखीवजागेसाठी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत घेण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्याऐवजी विहित नमुन्यातील हमीपत्र घेण्यात येणार आहे.

ही आहे वेबसाइट
https://panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नामनिर्देशनपत्राचा नमुना २४ तास उपलब्ध राहील.
ऑन"लाईन' उमेदवारी अर्ज
१, वेबसाइटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंट आउट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी लागेल.
२, स्वाक्षरी केलेली प्रिंट आउट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत दाखल करावी लागेल.
३, चिन्ह वाटप झालेल्या उमेदवारांची घोषणापत्रे जोडपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात येतील.
सर्व काही ऑनलाइन
नामनिर्देशनपत्रत्यासोबत संभाव्य कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण आवश्यक आहे. उमेदवारांची सर्व माहिती व्यवस्थितरीत्या संकलित व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे.
बातम्या आणखी आहेत...