आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gramsevak Agitation News In Marathi, Grampanchayat Offices

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील ग्रामसेवकांचे आजपासून आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांची वेतन त्रुटी दूर करणे व ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रविवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या बैठका झाल्या या बैठकीमध्ये आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने 13 फेब्रुवारीला ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना ग्रामसेवकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मात्र, त्यावर सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे युनियनने 17 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकांप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरावा, 20 ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करणे, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढी देणे, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार रुपये देणे, ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करणे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा कार्यकारिणीची रविवारी बैठक घेण्यात आली.


आंदोलनाचे टप्पे : 17 फेब्रुवारी - सर्व पंचायत समितींसमोर धरणे, 18 फेब्रुवारी - जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन , 20 फेब्रुवारी - जिल्ह्यातील ग्रामसेवक व राज्यातील ग्रामसेवक जिल्हा परिषदेंवर मोर्चा काढतील, 24 फेब्रुवारी - पासून राज्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू


आंदोलनामुळे ग्रामविकासाला बसणार खीळ
शासनाच्या अनेक योजना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झपाट्याने मार्गी लावल्या जातात, ती सर्व कामे ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे प्रभावित होणार आहेत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यतासुद्धा अधिक आहे. 100 टक्के वसुलीचे ध्येय साध्य होणार नाही.


24 पासून कामबंद आंदोलन करू
17 फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास कामबंद आंदोलन करणार आहोत. ’’ अशोक कोहर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन