आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादातून नातवाने केली अाजाेबाची क्रूर हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अमानतपूर ताकोडा येथे घटनेनंतर नागरिकांनी गर्दी केली हाेती.
अकोला - आजोबा आणि आजी झोपलेली असताना, नातवाने अचानक कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात आजोबा झोपेतच गतप्राण झाले, तर आजी गंभीर जखमी झाली. ही घटना येथून जवळच असलेल्या अमानतपूर ताकोडा येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडले.

गोविंदराव धन्नाजी मोरे (वय ७५) असे मृतक वृद्धाचे नाव आहे. गोविंदराव आणि त्यांची तिसरी पत्नी हे दोघेच साेबत राहतात. गोविंदराव यांना तीन बायका झाल्या. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीला सचिन वाल्मीक खंडारे (वय २०) नावाचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आणि गोविंदरावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संपत्तीच्या वादातून भांडणे आहेत. रविवारी त्यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचला. सचिन खंडारे हा रविवारी अकाेल्यात आला होता. रात्री तो पायीच अकोल्याहून अमानतपूर ताकोड्याला पोहोचला. रात्री दोन वाजता घरातील कुऱ्हाड घेतली आणि आजोबा गोविंदराव मोरे यांच्या घरी पोहोचला. त्याने झोपेत असलेल्या गोविंदराव मोरे आणि त्याची आजी आशाबाई मोरे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात आजोबाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आजी गंभीर जखमी झाली. सकाळी शेजारील महिला त्यांच्या घरी गेली असता तिला घरात गोविंदराव आणि आशाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील अमरसिंग लालसिंग भोसला यांना दिली. त्यांनी लगेच डाबकी रोड पाेलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संशयित नातू सचिन खंडारे याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली आहे.

कारवाई : केलेआरोपीला गजाआड
डाबकीरोड पोलिस सोमवारी सकाळी घटनास्थळावर पोहोचले. या वेळी पोलिस पाटलांनी सचिन खंडारे याच्यावर संशय असल्याचे सांिगतल्यानंतर त्यांनी सचिन खंडारेच्या घरी मोर्चा वळवला. या वेळी "तू आजोबाला का मारले' असे विचारताच सचिन घाबरला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची कसून चौकशी करीत आहेत.

दुर्लक्ष : केली नातवाविरुद्ध तक्रार
सचिनखंडारे याच्याविरुद्ध त्याचे आजोबा गोविंदराव मोरे यांनी डाबकी रोड पोलिसात काही दिवसांपूर्वीच तक्रार दिली होती. सचिन हा त्यांना शिवीगाळ आणि नेहमी मारहाण करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच माेरे यांना अापला जीव गमवावा लागला.

कारण : गोविंदराव मोरेंना तीन बायका
गोविंदरावमोरे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एसटी बसमध्ये चालकाची नोकरी केली होती. त्यांना तीन बायका असून, पहिली पत्नी गावातच त्यांच्यापासून वेगळी राहते. तिला एक मुलगी आहे आणि त्या मुलीला एक सचिन नावाचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आणि गोविंदराव मोरे यांच्यात संपत्तीवरून वाद होता, तर गोविंदराव यांच्या दुसऱ्या पत्नीचे निधन झाले होते. तिसरी पत्नी आशाबाई या गोविंदरावांसोबत राहते.

डोक्यावर केले वार
सचिन याने घराच्या हिस्सेवाटणीवरून गोविंदराव मोरे आणि आशाबाई मोरे यांना झोपेत त्यांच्या डाव्या कानावर, जबड्यावर, नाकावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच आशाबाई यांच्या कपाळावर, डोक्यावर वार केले.