आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Dr. Ranjit Patil Speak About Jalshivar Yojana

२०० गावे करणार जलयुक्त, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जलयुक्त शिवार योजनेद्वारे अकोला जिल्ह्यातील २०० गावे जलयुक्त करणार असल्याची घोषणा जिल्‍ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात बोलताना केली. शास्त्री क्रीडांगणावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. आरंभी डॉ. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, होमगार्डचे जिल्हा समादेशक विजय उजवणे, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी मानवंदना स्वीकारली.

दोन हेक्टरच्या आतील अल्पभूधारकांना आम आदमी योजनेचा लाभ दिला जात आहे. त्याअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास लाभ देण्यात येतो. या वर्षी १५० दावे नोंदवले असून ४१ मंजुर दाव्यांना १२ लाख ३० हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या विमाधारकांच्या वी ते १२ वी वर्गात शिकत असलेल्या पाल्यांना दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील एकूण २१७० रुग्णांना कोटी ७४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. तसेच नगर विकासाला चालना देण्यासाठी बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण धोरणाच्या मदतीने गरजुंसाठी जास्तीतजास्त गृहसुविधा निर्माण करण्याचे धोरण असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वंदना हेमंत पिंपळखरे यांना प्रदान करण्यात आला. १० हजार एक रुपये रोख, ताम्रपट, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. जिल्हास्तरीय लघुउद्योग पुरस्कार यश पेपर इंडस्ट्रीजच्या वैशाली मोहन गावंडे प्रथम तर द्वितीय अक्षय केमिकल्सचे शैलेंद्र भुतडा यांना देण्यात आला. जिल्हा क्रीडा गुणवंत खेळाडू, जिल्हा युवा पुरस्कार कांचन जोतवाणी बॉक्सिंग, विक्रमसिंह चंदेल पुरुष बॉक्सिंग यांना देण्यात आला. जिल्‍हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार सुशील मोहोड वेटलिफ्टिंग, गुणवंत संघटक सचिन अमीन, जिल्हा युवक पुरस्कार २०१३-१४ साठी विशाल राखोंडे पातूर यांना देण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सन २०१२-१३ तील प्रसिद्धीसाठी रामराव वनारे प्रथम रु. २५ हजार, मो. शब्बीर मो. याकूब द्वितीय रु. १५ हजार यांना वितरीत करण्यात आला.

आम आदमी योजनेचा लाभ
जिल्‍ह्यातीलदोन हेक्टरच्या आतील अल्पभूधारकांना आम आदमी योजनेचा लाभ दिला जात आहे. त्याअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास लाभ देण्यात येतो. या वर्षी १५० दावे नोंदवले असून ४१ मंजुर दाव्यांना १२ लाख ३० हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

ई-म्युटेशन म्हणजेच ऑनलाईन फेरफार उपक्रमामध्ये अकोला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तेल्हारा तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.गतीमान प्रशासन लोकाभिमूख होण्याच्यादृष्टीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानात अकोला जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.