आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिजापूर तालुक्यात गारांसह वादळी पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मूर्तिजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नाल्याला आलेले पाणी.
मूर्तिजापूर - तालुक्यातीलकुरूम परिसरात बुधवारी दुपारी वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. राजनापूर, खिनखिनी, सेंदापूर, कवठा, कुरूम आकोली या गावांमध्ये मुसळधार पाऊस गारपीट झाली. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाला आहे.

कुरूम परिसरात दुपारी वाजता ढग आले काही क्षणातच पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर पावसाचे रूपांतर गारपिटीत झाले. जवळपास अर्धा तास गारांसह पाऊस झाल्याने राजनापूर, खिनखिनी येथे घरांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेल्या गव्हाचे हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. तसेच भुईमुगाच्या पिकालाही फटका बसला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच कुरूम परिसरात गारपीट झाल्याने सर्व पिके भुईसपाट झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशीतरी पैशांची व्यवस्था करून रब्बी हंगामाची तयारी केली. शेतामध्ये मिरची, भाजीपाला, भुईमुगाची लागवड केली. मात्र, बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ही पिके भुईसपाट झाली. त्यामुळे बँकेचे काढलेले कर्ज कसे फेडावे, मुलामुलींचे लग्न कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.