आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीवेळीत गारपीट; चक्रीवादळाचा तडाखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळीवेळी- अकोटतालुक्यातील केळीवेळी परिसराला आज दुपारी अचानक आलेल्या चक्रीवादळ गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यामध्ये शेतातील कपाशी, सोयाबीन यांसारखी पिके नेस्तनाबूद झाली असून, गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली आहे. या वादळामुळे येथील सखाराम महाराज विद्यालयाच्या पोषण आहार शिजवण्याच्या खोलीवर नजीकचे बाभळीचे झाड कोसळले. आज ईदनिमित्त शाळा बंद असल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, वादळामुळे ठिकठिकाणी झाडे वीज खांब पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला असून, अकोला ते दहीहांडा हा मार्गही बंद झाला आहे.
केळीवेळी परिसरातील किनखेड, जवखेड, काटी या गावांत आज दुपारी तीन वाजता अचानक जोरदार चक्रीवादळ आले. वादळापाठोपाठ १५ मिनिटे गारपीटही झाली. यामध्ये सुरुवातीला हरभरा नंतर िलंबाच्या आकाराएवढी गार झाल्याने मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. एक बाभळीचे मोठे झाड या वादळामुळे गावातील सखाराम महाराज विद्यालयातील पोषण आहार शिजवण्यासाठी बांधलेल्या टिनपत्रांच्या खोलीवर पडल्याने ही खोलीच कोलमडून पडली आहे. आज ईदनिमित्त शाळा बंद असल्याने यामध्ये जीवितहानी झाली नाही. शाळा सुरू असती, तर या कल्पनेनेही आता गावकऱ्यांना घाम फुटत आहे. जोरदार चक्रीवादळ, गारपीट त्यापाठोपाठ झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली कपाशी, सोयाबीन, हायब्रीड ही पिके भुईसपाट झाली. या झाडांना फुलपाती तर सोडा, एक पानही राहिले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे केळीवेळी गावातील देवीदास बेंडे, मंगेश सातारकर, विनायक खेडकर, दत्ता ठाकरे, सुरेश भटकर इतर नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळीवेळी परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जाण्याच्या मार्गावर होती. त्यांना पावसामुळे दिलासा मिळाला असता मात्र, आलेल्या चक्रीवादळामुळे सर्व पिकेच भुईसपाट झाल्याने पिकाच्या उत्पादनाची कोणतीच अपेक्षा उरलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने या नुकसानीचा सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गारांचारस्त्यांवर साचला थर
केळीवेळीपरिसरात आज दुपारी १५ मिनिटांपर्यंत लिंबाच्या आकाराची गार पडली. या वेळी रस्त्यांवर सर्वत्र गारांचा थर साचला होता. साधारणत: पावसाळ्यात गारा पडत नाही, असा अनुभव आहे. मात्र, आज झालेल्या गारपिटीने हा समज खोटा ठरवला आहे. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.केळीवेळीसह किनखेड, जवखेड, काटी या गावांमध्ये सोमवारी दुपारी चक्रीवादळ आले.