आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलो... बँकेमधून बोलतोय; आपला एटीएम क्रमांक सांगा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा-"तुमचेएटीएम कार्ड बंद पडले आहे, कार्डवरील नंबर सांगा, ते मी सुरू करून देतो', अशा प्रकारचा फोन आला तर सावधान... तुमच्या कार्डची विचारणा करून तुमच्या खात्यावरील पैसे सहज काढून घेण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत.

आधुनिक जगताच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इंटरनेटचा वापर अपरिहार्य बनलेला आहे. कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या माध्यमातून प्रत्येक जण सध्या इंटरनेटशी जोडला जात आहे. त्या माध्यमातून जग मुठीत आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने कामे होण्यासाठी सध्या सर्वच स्तरावर ऑनलाइन कामे वाढली आहेत. व्यवसाय उद्योगाच्या पातळीवर तर सर्वच गोष्टी पूर्णत: ऑनलाइन करण्याकडे कल वाढला आहे. शासकीय व्यवहारही पुढील काळात बहुतांशपणे ऑनलाइन होतील, अशी परिस्थिती आहे. परंतु, या सायबर युगातही मानवी मनातील या गुन्हेगारीच्या वाटा-पळवाटा थांबलेल्या नाहीत. आज तंत्रज्ञानाची महिती नसलेल्या अनेकांना एटीएम वापराची तंत्रशुद्ध माहिती नाही. त्यातच निनावी फोन करून एटीएम क्रमांकाची माहिती विचारून खात्यावरील पैसे काढले जात आहेत.
बँकेचा अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएमचा पीन क्रमांक विचारून फसवणूक केली जात आहे. परंतु, आता अत्याधुनिक पद्धतीने केवळ एटीएम कार्डवरील नंबर विचारून खात्यावरील पैसे काढण्याचा फंडा हायटेक चोर राबवत आहेत. त्यामुळे मोबाइल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तर त्याला खाते क्रमांक, एटीएम क्रमांक याची कोणतीही माहिती देऊ नये. जर असा फोन आलाच तर बँकेत जाऊन खातरजमा करावी. फोन कोणी केला, त्याचे नाव काय, याची विचारपूस करावी. परंतु, आपली माहिती त्याला देऊ नये. असे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे.

अशा निनावी फोनवरून आपली इत्यंभूत माहिती विचारली जात असताना बरेच सुशिक्षित खातेदारही याला बळी पडताना दिसतात. आपल्या खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम सुद्धा समोरच्या व्यक्तीला सांगत असल्याचे उघड झाले आहे.
नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर
लॉटरीलागल्याचा मेल पाठवून, जमिनीवर टॉवर मंजूर झाल्याचे सांगत तसेच एटीएम कार्डचा क्रमांक विचारून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात घडत आहेत. परंतु, या गुन्ह्यांची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. फोन भारतातून आला तरी, क्रेडिट एटीएम कार्डवर खरेदी जगातल्या कोणत्या तरी देशात झालेली असते. नायजेरियन फ्रॉडचीही तशीच पद्धत आहे. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना मर्यादा आहेत. किंबहुना सायबर क्राइमचा एखाद-दुसराच गुन्हा आतापर्यंत पोलिसांना उघडकीस आणता आलेला आहे. परंतु, हे सर्व गुन्हे वैयक्तिक स्तरावरचे होते.
बातम्या आणखी आहेत...