आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंगांना मिळणार आता ऑनलाइन प्रमाणपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अपंग प्रमाणपत्र वितरणात होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी आता ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे.


कर्णबधीर, मतिमंद, मानसिक आजार आदींचे ऑनलाइन प्रमाणपत्र सवरेपचार रुग्णालयात देण्यात येत आहे. पूर्वी विहित नमुन्यात अपंगांसाठी हस्तलिखित प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयांकडून मिळत होते. या प्रमाणपत्रात बदल करून बनावट प्रमाणपत्र मोठय़ा प्रमाणात बनवल्या जात होते. अशा बनावट प्रमाणपत्रांचा वापर होत असल्यामुळे फसवणूक होत होती. आरोग्य विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर अपंगांसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ऑनलाईन प्रमाणपत्रामध्ये वैयक्तिक ओळखपत्र नंबर(पीआयएन) देण्यात आला आहे. हा नंबर राज्य शासनाच्या वेबसाईटवर टाकल्यास तत्काळ संपूर्ण प्रमाणपत्र दिसणार आहे.


पारदर्शकता आली
ऑनलाइन प्रमाणापत्र देण्याचा उपक्रम शासनाने सुरू केल्याने आता पूर्णपणे पारदर्शकता आली आहे. जे गरजू आहेत त्यांना भविष्यात या प्रमाणपत्रांचा उपयोग होणार आहे. तसेच या ऑनलाइन प्रक्रीयेमुळे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍यांवर वचक राहणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्राचा पश्‍नच राहणार नाही. राजेश कार्यकर्ते, प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता, सवरेपचार रुग्णालय, अकोला


कसा होतो गैरवापर
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, रेल्वेमधील प्रवास तसेच सरकारी व निमसरकारी नोकरीसाठी हस्तलिखीत बनावट प्रमाणपत्रांचा वापर करण्यात येत होता. आता अपंगांच्या ऑनलाईन प्रमाणपत्रामध्ये वैयक्तिक ओळखपत्र नंबर ऑनलाइन असल्यामुळे गैरप्रकार टाळता येणार आहेत.