आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hapoos Mango News In Marathi, European Market, Divya Marathi

प्रत्येकाला चाखता येईल हापूसची चव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आंब्याचा महाराजा हापूस क्वचितच सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येतो. पण, 1 मेपासून युरोपमध्ये हापूस आंब्यावर बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्रीयदृष्ट्या नुकसान झाले असले, तरी सर्वसामान्य लोकांना याचा फायदाच झाला आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा अकोलेकरांना कमी दरात मिळत असून, त्याचे भाव जवळपास 200 रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळेच आता प्रत्येकाला रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे. शहरात दक्षिण भारत आणि गुजरातमधूनदेखील हापूस आंब्याची आवक होते. पण, रत्नागिरीच्या हापूसचे लोकांना वेगळेच आकर्षण आहे. शहरात दरवर्षी रत्नागिरीच्या हापूसच्या आवकचे प्रमाण कमी असते. पण, सध्या निर्यात बंदीचा एक प्रकारचा फायदा शहरातील आवक वर झाला आहे. आवक वाढल्याने साहजिकच भावात घसरण झालेली दिसून येते.

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आंब्याचे दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. मागच्या आठवड्यात 600 रुपये डझन मिळणार्‍या आंब्याचे दर सध्या 400 रुपये झाले आहेत. सध्या बाजारात रत्नागिरीचा हापूस आंबा 200 ते 400 रुपये दराने मिळत आहे. फळाचा आकार, दर्जा यावर त्याचे दर कमी जास्त आहेत.

दरवर्षी हापूस आंब्याचे दर मे महिन्याच्या शेवटी काही अंशी कमी झालेले पाहायला मिळतात. पण, यंदा झालेल्या निर्यात बंदीमुळे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव घसरल्याने सर्वसामान्य लोकांना फायदा झाला आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला उत्तम दर्जाचा हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्यात आल्याने अकोलेकर सुखावले आहेत.

भाव वाढीची शक्यता नाही
हापूस आंब्याची आवक वाढल्याने आता भाव वाढणार नाही. निर्यात बंदीचा नागरिकांना फायदा असून, चांगल्या दर्जाचा आंबा कमी भावात मिळत आहे.’’ पंकज शिवाल, आंब्याचे व्यापारी