आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य योजनेत तीन रुग्णालयांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यात दोन लाखांवर लाभार्थी आहेत. या लाभार्थींच्या आरोग्य सुविधेसाठी जिल्ह्यातील तीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. कुणीही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने लाभार्थी शोधून काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले आहे.
गुरुवारी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ सवरेपचार रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. सर्वांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गत महिन्यात योजना कार्यान्वित केली नाही. मात्र, आचारसंहिता संपल्यामुळे आता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना लाभ देताना प्रथम शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. खासगींच्या तुलनेत सरकारी रु ग्णालये कमी पडू नये, यासाठी तालुका स्तरावर आरोग्य मेळावे घेऊन रुग्ण शोधावे लागतील. कुणीही योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट केले. तक्रारी स्वीकारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये शासकीय रुग्णालयासह संत तुकाराम कॅन्सर रुग्णालय, मुरारका आर्थोपेडिक, हेमंत जोशी आर्थोपेडिक रुग्णालयांनी सहभाग नोंदवला आहे.