आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Card Start Distributing The Hands Of Guardian

पालकमंत्र्यांच्या हस्ते आरोग्यपत्र वितरणास प्रारंभ- लाभ घेण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत स्थानिक टपाल कार्यालयात 26 जानेवारीला आरोग्यपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योजनेचे जिल्हा समन्वयक सुनील वाठोरे यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून 25 जानेवारीपर्यंत 213 रुग्णांनी जिल्ह्यात व बाहेरील जिल्ह्यात एकूण 90 लक्ष 57 हजार 850 रुपयांच्या अनुदानातून उपचाराचा लाभ घेतला. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी अंगीकृत रुग्णालयातून लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उप-जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, आरोग्य उपसंचालक डॉ. एस. के. जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर, टपाल विभागाचे प्रवर विभागीय अधीक्षक बेग, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हा प्रमुख रोमर शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दृष्टिक्षेपात योजना
जिल्ह्यामध्ये 45 टपाल कार्यालयांमार्फत आरोग्यपत्र उपलब्ध करून दिले जातील. आरोग्यपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र, संग्राम, टपाल कार्यालयातून शिधापत्रिका, फोटो, ओळखपत्र घेतल्यावर लाभार्थ्यांनी कु टुंबातील सदस्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी स्टॅम्प आकाराचे फोटो चिकटवायचे आहेत. त्यानंतर नामनिर्देशित अधिकार्‍याकडून आरोग्यपत्र साक्षांकित करून घ्यायचे आहे. या प्रक्रियेनंतर आरोग्यपत्राचा रुग्णालयीन उपचारासाठी उपयोग होऊ शकेल. जिल्ह्यातील आरोग्य सहायक, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक पोस्ट मास्टर, वैद्यकीय महाविद्यालयीन अधिकारी, राजपत्रित अधिकार्‍यांना आरोग्यपत्र साक्षांकनाचे अधिकार दिले आहेत.