आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Green Hospitals, Divya Marathi, Health Department

राज्यातील ग्रामीण भागात लवकरच हरित रुग्णालये सुरू होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वच्छतेच्या अभावामुळे जडणारे नवीन आजार अशी सरकारी रुग्णालयांची प्रतिमा आहे. मात्र, या प्रतिमेला छेद देत आता आरोग्य विभागाने रुग्णालयाचे नवीन मॉडेल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर भरपूर हवा, नैसर्गिक प्रकाश, मुबलक पाणी आणि सौर ऊज्रेचा जास्तीत जास्त वापर करून सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये हरित रुग्णालये ही संकल्पना राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागात 60 आरोग्य केंद्रांची निर्मिती करून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
सौर ऊज्रेचा अधिकाधिक वापर होऊन विजेची बचत व्हावी, या उद्देशाने हरित रुग्णालय उभारण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांचा नकाशा एकच असेल. येथे रुग्णांना मोकळे वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये या रुग्णालयांची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाने पूर्वी बांधलेली रुग्णालये आता रुग्णासांठी अपुरे पडताहेत तसेच ती आता बरीच जुनी झाली आहेत. त्याच जागेवर किंवा नवीन प्रशस्त जागेची निवड करून नवीन रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे.
ही सर्व रुग्णालये सौर ऊज्रेवर आधारित असल्यामुळे या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात विजेची बचत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात राज्यात 60 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 200, 100, 30 आणि 50 खाटांच्या सहा रुग्णालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही रुग्णालये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणार आहे.
सरकारी रुग्णालयांकडे घेतील नागरिक धाव
हरित रुग्णालयांची उभारणी झाल्यास अशी रुग्णालये स्वच्छ राहतील. हरित रुग्णालयांची संकल्पना ही रुग्णांच्या हिताची आहे. अशा रुग्णालयांकडे रुग्ण धाव घेतील. मात्र, याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे अद्याप माहिती नाही. नितीन अंबांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.
उपसंचालकांना दिल्या आहेत सूचना
सद्य:स्थितीतील रुग्णालयांमध्ये हरित रुग्णालयांच्या संकल्पनेनुसार बदल करण्यात येत आहेत. एप्रिल 2014 नंतर नवीन बांधकाम होणार्‍या राज्यातील सर्व रुग्णालये हरित रुग्णालये म्हणून कार्यान्वित होतील. याबाबतच्या सूचना आरोग्य संचालकांसह संबंधित विभागाच्या उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. सुजाता सौनिक, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय