आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवाशांसह रुग्णांच्या आरोग्याशी खेळ, धडधाकटही पडतात आजारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वोपचाररुग्णालय प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीमुळे रुग्णालय परिसरातील निवासस्थानामध्ये राहणाऱ्या रहिवाशांसह रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महािवद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाच्या विविध वाॅर्डात तसेच मोकळ्या जागेवर बायोमेडिकल वेस्टचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांचेही आरोग्य बिघडत आहे.

सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार वैद्यकीय महािवद्यालय प्रशासनाच्या नियंत्रणात चालतो. सर्वोपचारमध्ये जवळपास ३० वाॅर्ड आहेत. यामध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभाग, अपघात कक्ष, अस्थिव्यंग विभाग, बालरोग विभाग, नेत्रविभाग, जनरल वाॅर्ड, जळीत कक्ष, अतिदक्षता विभाग आदींचा समावेश आहे. रुग्णालयाच्या प्रत्येक वाॅर्डमध्ये तसेच मोकळ्या जागेत बायोमेडिकल वेस्ट तसेच कचरा साचलेला दिसून येतो. सलाईन, इंजेक्शन, प्लास्टिक यासह कचरा अनेक वाॅर्डामध्ये ३० ऑगस्ट रोजी आढळून आला. वाॅर्डमधील परिचारिकांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ही आमची जबाबदारी नसल्याचे सांगत जबाबदारी टाळली.

वाॅर्ड परिसरात तर सोडाच, पण वाॅर्डमध्येसुद्धा साफसफाई नियमित होत नसल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. रुग्णालयामध्ये प्रत्येक वाॅर्डाची जबाबदारी विशिष्ट विभागाच्या विभागप्रमुखांकडे देण्यात आली आहे. आपल्या अधिनस्थ असलेल्या वाॅर्डात स्वच्छता ठेवण्याकडे या विभागप्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
काय म्हणतो नियम
१.चोवीस तासांत विल्हेवाट करावी.
२. जैव वैद्यकीय कचरा हा लाल, पिवळ्या आणि काळया प्लास्टिकच्या टोपलीमध्येच ठेवावा.
३. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत संबंधित संस्थेचा वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार
४. रुग्णालय बंदचीसुद्धा होऊ शकते कारवाई
५. प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा शल्यचििकत्सक महापािलका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

निश्चित माहिती नाही
माझ्याकडे आज, ३० ऑगस्ट रोजीच डेप्युटी एमएसचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत सध्या सांगू शकत नाही. सोमवारी याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या प्रकाराबाबत सांगता येईल.'' डाॅ.अभिजित अडगावकर, डेप्युटीएम. एस. सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

नाकात दम आला
कित्येकदारुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कचरा नेण्याबाबत सांगितले. मात्र, ते ऐकतच नाहीत. कचरा टाकण्यासाठीसुद्धा कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही.'' रामदासफाळके, रुग्णनातेवाईक, खुमगाव बुर्ती.