आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Youth Were Stylish Sun Goggles Issue At Akola, Divya Marathi

शहरातील तरुणाईची लक्झेरियस गॉगलला पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी आरोग्य, त्वचेची काळजी घेण्यासोबतच डोळ्यांकडेदेखील विशेष लक्ष दिले जात आहे. तरुणाईचा सध्या लक्झेरियस गॉगलकडे कल असल्याचे दिसून येत आहे. गॉगलमध्ये अनेक प्रकार असून, मुलांमध्ये कलरफोनिक तर मुलींमध्ये मोनालिसा गॉगलची क्रेझ आहे.

डोळ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, हा गॉगलचा मुख्य उद्देश असला तरी त्याकडे एक फॅशन म्हणूनदेखील पाहिले जाते. गॉगलमध्ये अनेक ब्रँड असून, अनेक नवनवीन प्रकार येत असतात. सध्या युवकांमध्ये कलरफोनिक गॉगलची चलती आहे. या गॉगलचा अँव्हीएटर ग्लीडर ग्लास आहे. ग्लीडरमध्ये फ्लोरोसंट कॉन्ट्रस्ट रंगांचा वापर केल्याने आकर्षक लूक प्राप्त झाले आहे. यात रेड, ग्रीन, ऑरेंज, ब्लॅक, पर्पल, ब्ल्यू असे जवळपास 100 ते 150 रंगांचे कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत. 1600 रुपयांमध्ये येणारे हे गॉगल तरुणांच्या पसंतीस उतरत आहे.

गॉगलच्या फॅशनमध्ये नवीन प्रकार म्हणजे शेरीस गॉगल. हा लक्झेरियस गॉगल असून, त्याच्या बॉडीवर व्हेलव्हेटचा कोट देण्यात आला आहे. याचे मिरर ग्लास असून, काही निवडक रंगातच ते उपलब्ध आहेत. पाच हजार ते सात हजारामध्ये आहेत. याशिवाय नेहमी चालणारे अँव्हीएटर, वेफेरर आणि स्पोर्ट्स लूक गॉगल विविध रंगात, डिझाइनमध्ये उपलब्ध आहे.

हजार ते आठ हजार रुपये किमतीच्या या गॉगललादेखील मागणी आहे.
मोठे गोल ग्लास आणि त्यावर विविध डिझाइन असणारे मोनालिसा गॉगल तरुणींना लुभावत आहेत. या गॉगलमध्ये स्टोन वर्क आणि मेटल वर्कचे अनेक आकर्षक डिझाइन आहेत. पिंक, पर्पल, ब्लॅक, ब्राऊन, व्हाइट अशा रंगांचे फंकी लूक आहे. हे गॉगल जवळपास 450 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. मोनालिसाप्रमाणेच कॅट आय गॉगलल देखील मागणी आहे. कॅट आय म्हणजेच मांजरीच्या डोळ्यांप्रमाणे या ग्लासचा शेप आहे. ब्लॅक अँड व्हाइट रंगातील या गॉगलची किंमत 950 ते 4000 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय वेफेरर ग्लासचीदेखील चलती असून, हे गॉगल 750 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यत उपलब्ध आहेत.

ब्रँडप्रमाणे डिझाइनवर तरुण देतात भर
गॉगल घेताना ब्रँडप्रमाणेच त्याच्या डिझाइनवर तरुण लक्ष देतात. काही ब्रँडमध्ये सतत नवनवीन डिझाइन येत आहेत. अनेक ब्रँड असले तरी, तरुणांची लक्झेरियस गॉगलला अधिक मागणी आहे.’’ जेमिन पारेख, व्यावसायिक