आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEALTH ALERT: हृदयविकाराचे वय 40 हून 20 वर, आताच घ्‍या काळजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराचा धोका निर्माण झाला आहे. सरासरी 100 पैकी 25 व्यक्तींना हृदयविकाराचा धोका निर्माण झाल्याचे शहरातील डॉक्टरांकडे येणार्‍या रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे, तर मानसिक ताणतणावामुळे हृदयविकाराचे वय 40 हून 20 वर आले आहे. राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यास हृदयविकार होतो. त्यामुळे हृदयाची काम करण्याची शक्ती कमी होऊन झटका येतो. अगोदर 40 वयाच्या आत हृदयविकाराचा झटका येत नव्हता. मात्र, आजकाल जीवनशैलीत बदल झाल्यामुळे हृदयविकाराचे वय 20 वर आले आहे. 50 वर्षांपर्यंतच्या पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.