आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावात दोन दिवसांत दीड इंच पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - मावळत्या वर्षाअखेर आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. एकीकडे नववर्षानिमित्त नागरिकांनी नववर्षाचे स्वागत आतशबाजी करून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन केले, तर निसर्गानेही एकप्रकारे नागरिकांचे स्वागत पर्जन्यवृष्टीने केल्याचा अनुभव आला.
दरम्यान, खामगाव शहरात दोन दिवसांच्या कालावधीत दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.

खामगाव शहरात परिसरात ३० डिसेंबर रोजी रात्री २.३० वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. थोडा वेळ विश्रांती घेत अधून-मधून पाऊस पडत होता. तिच परिस्थिती ३१ डिसेंबर रोजीही कायम राहिली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तसेच वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. या अवकाळी पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. आधीच कडाक्याची थंडी असताना त्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.
३० िडसेंबरच्या रात्रीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ३१ डिसेंबरचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून आले. एक जानेवारीलार सकाळीही शहरात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

तालुक्यातील ११ महसुली मंडळांमध्ये एक जानेवारी रोजी सकाळी वाजेपर्यंत मागील २४ तासांत काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला. लाखनवाडा येथे सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे ६४ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला, तर सर्वात कमी १३ मिलीमीटर पाऊस िपंपळगावराजा मंडळात नोंदवण्यात आला, अशी माहिती येथील तहसील कार्यालयाने दिली आहे. या अवकाळी पावसामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.

अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल
^धाडभागातील गारपीटग्रस्त शिवाराची पाहणी केली असून याबाबतचा प्राथमिक पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. दीपकबाजड, तहसीलदार,बुलडाणा.