आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Transports Are Not Allowed On Day In Akola

शहरातील जड वाहतूक दिवसा राहणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - व्यापारी नागरिकांची मागणी विचारात घेऊन शहरातील सर्वच रस्त्यांवरील जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आला आहे. सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत मालवाहू वाहनांना शहरात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
शहरातील तसेच लगतच्या जड मालवाहू वाहनधारकांना, वाहनचालकांना वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले की, वाढती लोकसंख्या , नागरिकांची जीवनशैली याचा परिणाम म्हणून वाहनांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. या वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराच्या व्यापारी, शैक्षणिक सांस्कृतिक महत्त्वामुळे बाहेरील वाहनेसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरात येतात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील मार्गांचे सर्वेक्षण जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी त्यांनी रहदारीच्या विनिमयासाठी सुव्यवस्था राखण्यासाठी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या पुढे जुलै २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान सकाळी ते रात्री १२ वाजताच्या दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर जड मालवाहू वाहनांसाठी प्रवेशबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

नागरिकांनी करावे सहकार्य
कापड,किराणा, कोठडी बाजार, शहराच्या मध्यभागी आहे. मोठी वर्दळ असल्यामुळे अपघात राेखण्यासाठी वाहनांची आवक-जावक बंद करणे जरुरीचे झाले होते. नागरिकांनी सहकार्य करावे.'' प्रकाश सावकार, पोलिस निरीक्षक शहर वाहतूक

1 शालिनीटॉकीज ते अकोट स्टँड चौकपर्यंत
2 दगडीपूल ते माळीपुरा चौक, मामा बेकरी टी पॉइंट, बियाणी चौकापर्यंत
3 अकोटस्टँड चौककडून अग्रसेन चौककडे येणारा रस्ता
4 अग्रसेनचौक ते बाजारपेठेत जाणारा मार्ग
5 टॉवरचौक ते फतेह चौकाकडे जाणारा मार्ग
6 रेल्वेस्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलिस ठाणेकडून दामले चौक ते फतेह अली चौककडे जाणारा रस्ता
7 बाळापूर नाकाकडून शहरात येणारा मार्ग
8 वाशीम बायपासकडून शहरात येणारा मार्ग
9 डाबकीरोड रेल्वे फाटककडून शहरात येणारा मार्ग या रस्त्यावर मालवाहू वाहनास बंदी आहे.