आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून लुटता येईल हेलिकॉप्टर फेरीचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-आकाशात घिरट्या घालणारे विमान किंवा हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिले आहे. त्यामध्ये बसण्याचा मोहदेखील अनेकांना होतो. मात्र, आता अकोलेकरांना हेलिकॉप्टर फेरीचा आनंद घेण्याची संधी आली आहे.

शुक्रवारी या हेलिकॉप्टर फेरीच्या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी अनाथार्शमातील मुलींना फेरी मारून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळाल्याचा आनंद या मुलींच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.

अकोला शहरात प्रथमच प्रभात डे बोर्डिंगने हेलिकॉप्टर फेरीचा हा उपक्रम आयोजित केला आहे. वाशिम रोडवरील या स्कूलच्या प्रांगणात त्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. गुडधी येथील आर्शमातील तन्मया (15), वैष्णवी (10) आणि मुस्कान (6) या मुलींनी पहिल्या हेलिकॉप्टर फेरीचा आनंद लुटला.

सहा मिनिटांच्या या फेरीमध्ये शहराचे विलोभनीय दृश्य आकाशातून दिसणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या फेरीचा आनंद मुला,मुलींना लुटता येणार आहे. या हेलिकाप्टरच्या दररोज दीडशे फेर्‍या होणार असून, एका फेरीत तीन मुले किंवा मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मिळणार आहे.

या हेलिकॉप्टर फेरीच्या उद्घाटनप्रसंगी दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक प्रेमदास राठोड, संस्थेचे संचालक डॉ. गजानन नारे, कंत्राटदार प्रदीप देशमुख, पत्रकार रवी टाले, सुधाकर खुमकर, अविनाश परळीकर, अनिल माहोरे, नीरज आवंडेकर यांची उपस्थिती होती.