आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनौषधीच्या वृक्षसंवर्धनाचा ज्येष्ठ नागरिकांचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वनामधील औषधींचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने ही वृक्षलागवड करून संवर्धनासाठी त्यांना नियमित पाणी देण्याचा संकल्पही ज्येष्ठ नागरिकांनी केला. मलकापूररोडस्थित गणपती मंदिराजवळील कोठारी वाटिका क्रमांक 5 मध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वनौषधीच्या 15 वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये अर्जुन, बिहाडा, ब्राम्ही, गुळवेळ, बावची, सफेद मुसाळी, गुंज, तुळस यांचा समावेश आहे. नाना इंगळे, फेस्कॉमचे सचिव विनायक पांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चौथमल सारडा, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुहास काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रभाकर पाठणकर, जयंत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप काकडे, शिवभगवान भाला, हुकूमचंद भूत, सुधीर मुलमुले, अरुण पांडे, दीपक जसवाणी, सुभाष चौधरी, छाया कडू, रश्मी जोशी, संध्या संघवयी, नेत्रा काकडे, उषा बोपडीकर, सुचिता मुलमुले, गीता जोशी, चंद्रप्रभा चौधरी, अंजली मोडक, सपना देशपांडे यांची उपस्थिती होती.
वनौषधी जपण्याचा दिला संदेश
जेष्ठ नागरिक संघाने शनिवारी वृक्षरोपण कार्यक्रमाअंतर्गत वन औषधी वृक्षांची लागवड करून त्यांनी वन औषधी जपण्याचा संदेश दिला. तर या वृक्षांच्या संवर्धनाची देखील विशेष दक्षता ज्येष्ठ नागरिकांनी ठेवली आहे. निसर्गाला जपण्याचा आदश्र ज्येष्ठ नागरिकांनी तरूण पिढीसमोर ठेवला.