आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात सर्वच वाहनांना आता हायसिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्यात आता सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गुन्हा करण्यासाठी वाहनांचा होणारा अवैध वापर रोखणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून फरार होणार्‍या वाहनचालकांची ओळख पटवून त्याच्यावर सहज कारवाई करता येणे पोलिस आणि प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना (आरटीओ) सहज शक्य होईल. या नंबर प्लेटवर बारकोडसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, असी प्लेट लावण्यासाठी नागरिकांना तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज आह़े

अनेक गुन्ह्यांमध्ये गाडीचा मूळ नंबर बदलून वाहनांचा गैरवापर केला जातो़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच वाहनांना एकसारख्या दिसणार्‍या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करण्यात येणार आह़े सुरक्षिततेच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व वाहनांना एकसारख्या नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार राज्य शासनाने परिवहन आयुक्तांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 50 अन्वये राज्यात दुचाकी, कार, ट्रक, ट्रॅक्टरसह सर्वच प्रकारच्या वाहनांच्या जुन्या नंबर प्लेट बदलून आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याच्या सूचना करण्यात येणार आह़े दोन वर्षांपूर्वी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याचा प्रस्ताव आला होता़ मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे तो मागे पडला़ सध्या तरी ही योजना प्राथमिक स्तरावर असून, टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व शहरांतील वाहनधारकांच्या नंबर प्लेटमध्ये बदल करण्यात येतील.

नंबरप्लेटवर आरटीओचे नियंत्रण : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेल्या या नंबर प्लेट्स टॅम्परप्रूफ आहेत़ आरटीओच्या परवानगीशिवाय या नंबर प्लेट्स कोणालाही बदलणे शक्य होणार नाही़ ज्याप्रमाणे बारकोडचा वापर बोडार्ंच्या आणि विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये करण्यात येतो अगदी त्याच पद्घतीने या नंबर प्लेट्सवरील प्रत्येक अक्षर हे त्या वाहनाची ओळख पटवण्यासाठी ‘युनिक आयडेन्टीटी’ कोडच असेल़

इन्फ्रारेडच्या मदतीने बारकोडमधील सांकेतिक माहितीचा उलगडा चटकन होतो़ अगदी त्याच पद्घतीने ‘एचएसएनपी’ वरील सांकेतिक माहिती बर्‍याच अंतरावरूनही मिळवण्यासाठी खास स्कॅनर पोलिस आणि आरटीओंजवळ असतील़ एखादा वाहनचालक रेड सिग्नल तोडून चौकातून पुढे निघाला तर चौकात बसवलेले खास सेन्सर चटकन नियम मोडणार्‍या वाहनाचा तपशील पोलिसांना त्यांच्या हाती असलेल्या रिमोट सिस्टिमवर दाखवेल़
त्यामुळे वाहनचालक पळून गेला, तरी नंतर त्याच्यावर कारवाई करणेही शक्य होणार आह़े

क्रोमियमचा वापर
‘एचएसएनपी’वरील क्रोमियम होलोग्राम हेच या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य आह़े ‘स्क्रु’ च्या मदतीने या नंबर प्लेट्सवर स्नॅप लॉक बसवले जाईल़ बसेस आणि इतर अवजड वाहनांवर ठरलेल्या निकषांच्या आधारावरच त्या त्या आकाराच्याच आणि पूर्वनिर्धारित फॉन्टच्याच नंबर प्लेट असतील़ आतापर्यंत वाहनचालक आपापल्या र्मजीनुसार वाहनांवरील नंबर प्लेट रंगवत होत़े नव्या नंबर प्लेटमध्ये या सर्व गैरप्रकारांना चाप बसेल़ प्रत्येक प्लेटवर रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप असेल़

अशी असेल नंबर प्लेट
दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी 200 बाय 100 मिलिमीटर

कार, प्रवासी वाहनांसाठी 340 बाय 200 मि़ मी़ आणि 500 बाय 120 मि़ मी़

ट्रक, बससाठी 340 बाय 200 मि़ मी़


नंबर प्लेट फायदेशीर; गैरप्रकारांना आळा बसणार
वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे फायदेशीर असून, त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसू शकेल. वरिष्ठांच्या निर्देशानुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसंदर्भात कारवाई करण्यात येईल.
विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.