आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमजान ईदचे हिंदू चिमुकलीला अनोखे ‘गिफ्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डॉक्टरांना देव मानणारे अनेक जण आज समाजात आहेत. कठीणप्रसंगी दु:खाच्या वेदनेतून बाहेर काढणारे डॉक्टरच असतात. मात्र, रुग्ण दगावला की त्याच डॉक्टरला दोष देऊन नातेवाईक रान उठवतात. या प्रवृत्तीला अपवाद ठरणारा अनुभव गुरुवारी डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या खासगी रुग्णालयात आला. तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुलाच्या उपचाराचे पैसे डॉक्टरांना देण्यासाठी आलेल्या वडिलांकडून डॉक्टरांनीही पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, डॉक्टर आणि आपला मुलगा गमावलेल्या वडिलांनी ते पैसे कठीण परिस्थितीतील मुलाच्या उपचारासाठीच वापरायचे, असा निर्धार केला आणि रमजान ईदच्या पर्वावर हिंदू मुलीला आरोग्यदायी अनोखे ‘गिफ्ट’ मिळाले.

बाळापूर येथील रहिवासी शेख करीम शेख रहिम यांच्या 23 वर्षीय शेख इम्रान नावाच्या मुलाचा मृत्यू डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी झाला होता. त्या वेळी उपचाराचे पैसे देणे शक्य न झाल्याने शेख करीम शेख रहिम यांनी गुरुवारी, 8 ऑगस्टला त्या उपचाराचे पैसे डॉक्टरांना देऊ केले. मात्र, सामाजिक भान ठेवून डॉक्टरांनीही पैसे घेण्यास नकार दिला.

त्या पैशांचा गरीब रुग्णांच्या उपचारासाठीच वापर व्हावा, असे शेख करीम व डॉक्टरांनी ठरवले. त्या आधारेच डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या रुग्णालयातच किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने उपचार घेणार्‍या कु. रोशनी जाधव या चिमुकलीच्या उपचारावर ते पैसे खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले. धर्माने हिंदू असलेल्या रोशनीला शेख करीम शेख रहिम व डॉ. प्रशांत मुळावकर यांच्याकडून रमजान ईदनिमित्त अनोखे गिफ्टच मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे हिंदू-मुस्लिमांच्या एकात्मतेला निश्चितच प्रोत्साहन मिळू शकेल.

माणुसकीची जाणीव झाली
आजच्या कलियुगातही माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव गुरुवारी घडलेल्या घटनेतून आला. असे चांगले लोक असल्यामुळेच जगात शांतता नांदत आहे.’’ डॉ. प्रशांत मुळावकर, अकोला.