आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबाच्या सरदाराच्या नावावरून ठेवले या गडाचे नाव, पुरातत्त्व विभाग करणार डागडूजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुन्या शहरात मोर्णा नदीकिनारी असलेला असदगड या किल्ल्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यातही त्याचे अस्तित्व अबाधित राहावे आणि येणाऱ्या पिढीला इतिहासाचा हा साक्षीदार पाहता यावा, या हेतूने पुरातत्त्व विभागाकडून त्याच्या डागडुजी कामाला सुुरुवात झाली आहे.
तीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे बांधकाम दगड, चुना विटांनी केले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडूनसुद्धा या किल्ल्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या वास्तूचे जतन करणे आवश्यक आहे. तसेच राजेश्वर मंदिर रस्त्याच्या बाजूचा भागही पडला आहे अजूनही भिंतीचे काही दगड पडत असतात. या किल्ल्यावर असलेला हवाखाना तर पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. आता तेथे केवळ भिंती खिडक्यांचे अवशेष बघायला मिळतात. किल्ल्याच्या भोवती संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.

१९५७ मध्ये केले होते काम
अकोलानगर परिषदेच्या वतीने वर्ष १९५७ मध्ये या किल्ल्याची डागडुजी काही ठिकाणी पुनर्बांधणी केली होती. मात्र, त्यानंतर त्याची योग्य निगा राखली नाही. मात्र, तेव्हापासून आताच या किल्ल्याची डागडुजी होते आहे.


असद खॉ नावावरून असदगड
सोळाव्या शतकात सम्राट औरंगजेब यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. त्यांनी शेतसारा वसुलीसाठी असद खॉ नावाच्या एका सरदाराला अकोला हे गाव दिले. असद खाॅ याने सन १६९७ मध्ये किल्ला बांधून त्याच्या संरक्षणासाठी तीन बुरूजही बांधले. या तीन बुरुजांपैकी असद बुरूज हा सर्वात मोठा असल्यामुळे त्याच्या नावानेच हा किल्ला ओळखल्या जातो.
अशी आहे रचना
किल्ल्याच्या पूर्वेकडे हवाखाना इमारत आहे. येथेच असद खॉ राहत होता. देश स्वातंत्र्यानंतर या किल्ल्यावर शहिदांचे स्मारक म्हणून आझाद पार्क बनवण्यात आले आहे. मात्र, किल्ल्यात जाऊन बघितले, तर शहीद स्मारकाचा अपमान होत असल्याचे निदर्शनास येते.

पुढील स्लाईडवर पाहा, या गडाची विहंगम दृश्ये...