आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Historical Places, Memorial In Bad Condition In Lonar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोणारमधील पुरातन वास्तू, स्मारकांची होते आहे वाताहत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - पुरातनवास्तूच्या जतनासाठी संवर्धनासाठी स्वतंत्र पुरातत्व विभाग निर्माण केला आहे. इंग्रज काळापासूनच पुरातन वास्तूचे महत्त्व समजून देखरेखीची जबाबदारी या खात्याकडे सोपवण्यात आली. पुरातन वास्तूचा मोठ्या प्रमाणात वारसा लोणार शहराला लाभला आहे. पुरातत्व लोणार मंडळाकडून मात्र त्याची अवहेलना होत आहे.

हजारो वर्षे पूर्वीच्या वास्तूंचे जतन होणे गरजेचे आहे. अरबो रुपये खर्च करूनही इ. स. ते १६ व्या शतकातील वास्तू निर्माण करता येणार नाहीत. म्हणून केंद्र शासन यावर कोट्यवधींचा खर्च करत आहे. परंतु, लोणार मंडळांतर्गत वास्तू बेवारस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिंदखेडराजा येथील राजमहलातून तोफ चोरीला गेल्याची घटना घडली. पुरातन वास्तूंची पडझड होणे नित्याचेच झाले आहे. परंतु, याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.

औरंगाबादमंडळाकडून नागपूरकडे गेल्याने दुर्लक्ष
एकवर्षापूर्वी औरंगाबाद पुरातत्व मंडळाकडे असलेले लोणार उपविभाग नागपूरला जोडल्यापासून पुरातन वास्तू स्मारकांची वाताहत सुरू आहे. लोणार सरोवराला जागतिक वारसा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात येणा-या पर्यटकांची संख्या, स्थळाविषयी असलेले त्यांचे मत विदेशी पर्यटक नोंद करतात. यावरून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळण्याला मदत होणार आहे. पर्यटन विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. विदेशी लोकांना सरोवराविषयी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे, भविष्यात काय, पर्यटनाचा कसा विकास करणार, कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार याबाबत पर्यटन विभागाकडे नियोजन आहे. परंतु, केवळ कागदी घोडे नाचवणा-या पुरातत्व विभागाकडे नियोजनाचा अभाव आहे.

वास्तूची होत आहे पडझड
मंदिराचीसतत होणारी पडझड, मौल्यवान वास्तूंची होत असलेली चोरी, देखरेख, साफसफाई यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाही. पुरातन वास्तूंची होत असलेली वाताहत पाहून पर्यटकालाही तेथे थांबावे वाटत नाही. सरोवरासोबतच शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन वास्तूमुळे पर्यटक दोन दिवस तरी शहरात खिळून राहावा, अशी अपेक्षा शासन पर्यटन विभागाची आहे. त्या दृष्टीनेच वेळोवेळी सरोवरासह पुरातन वास्तूंच्या जतनासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार समित्या गठित करण्यात आल्या. कोणत्याही वास्तूंचा ऱ्हास तसेच दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. जागतिक लोणार सरोवराच्या ठिकाणी असलेल्या पुरातन वास्तूंची अशी अवस्था झाली आहे.

सरोवर परिसरामधील स्थळांची झाली दुर्दशा
लोणार सरोवर जागतिक वारसा होण्याला पुरातत्व कारणीभूत राहणार आहे. त्यासाठी आधीच शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. एवढ्या महत्त्वाच्या खात्यात हलगर्जीपणा करणा-या कर्मचारी अधिका-यांवर वेळीच कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा लोणार विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. रंजनाराजेश मापारी, नगराध्यक्षा, लोणार.