आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलीक्रॉस स्कूलमध्ये चोरट्यांचा उच्छाद;१ लाख ६९ हजारांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जठारपेठेतील होलीक्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरी झाली. त्यात लाख ६९ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावर डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज नसल्यामुळे रात्री अंधारात शाळेतील मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या वेळी प्राचार्यांच्या दालनाचे कुलूप फोडले. त्यांच्या कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती. त्यात काहीही आढळून आल्यामुळे त्यांनी सुपरवायझरचे दालन तोडले. असे सात ते आठ रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी काही पैसे मिळतात काय त्याचा शोध घेतला. मात्र, शेवटी त्यांना लिपिकाच्या रूममध्ये असलेल्या कपाटात लाख ६९ हजार दिसून आले. ते त्यांनी लंपास केले. सकाळी सहाच्या सुमारास चौकीदाराच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांनी लिपिक बेनडिक्स सेबेस्टीन यांना माहिती दिली.

शाळेच्याबाहेर गेले नाही श्वान : माहितीमिळताच सहायक पोलिस निरीक्षक मुकुंदसिंग वाघमोडे घटनास्थळावर पोहोचले होते. त्यानंतर शहर पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक दाखल झाले होते.

सीसीटीव्ही कॅमेरे होते बंद :
शाळेतसीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, ते कॅमेरे शाळा सुटल्यानंतर बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे रात्री चोरी झाल्याचे फुटेज सीसीटीव्हीत मिळू शकले नाही.
कर्मचाऱ्यांचे फिंगर प्रिंट
पोलिसांनीशाळेतील काही कर्मचाऱ्यांचे फिंगर प्रिंट घेतले. या वेळी अनेक कर्मचाऱ्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. ज्या रूमचे कुलूप तोडण्यात आले त्या रूमशी संबंधित असणाऱ्यांचा त्यात समावेश होता. दरम्यान, पाेलिसांनी शाळेची तपासणी केली.
केला माजी एसपींना फोन
चोरीचीघटना घडल्यानंतर शाळा प्रशासनाने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याला आधी कळवता पाच वर्षांपूर्वी असलेल्या एसपींना फोन केला. त्यांनी नंतर सध्याचे एसपींशी संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी एसपींशी संपर्क साधला. यावरून आपण कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, हेसुद्धा माहीत नसल्याचे समोर आले.