आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homage Of Students And Professors, Latest News, Divya Marathi

गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सीताबाई कला महाविद्यालयात 1 मार्चला झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
इतिहास विषयात मोनाली देशमुख प्रथम, विष्णू घोवडे तृतीय, राज्यशस्त्र विषयात अजित राऊत प्रथम, अमोल ठाकरे सहावा, प्रदीप बोडखे सहावा, हिंदी विषयात पूनम मानकर द्वितीय, स्वाती खेमका तृतीय तर पूनम तेलगोटे हिने समाजशास्त्र विषयात विद्यापीठात नववे स्थान प्राप्त केल्याबद्दल त्यांना रौप्य पदक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्व. गोदावरीदेवी मोहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे पुरस्कार देण्यात आले तसेच डॉ. अजय सोळंके व डॉ. प्रसन्नजीत गवई यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल तर डॉ. स्नेहल शेंबेकर व डॉ. सुवर्णरेखा देसमुख यांची पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
याशिवाय शैक्षणिक सत्रात महाविद्यालयात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या, क्रीडा स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, सचिव अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रतन राठोड होते. प्रा. आदित्य अग्रवाल यांना अतिथींचा परिचय करून दिला. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डी. आर. खंडेराव यांनी प्रास्ताविकात विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. भारती पटनाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नाना भडके यांनी केले. या वेळी विद्यापीठ प्रतिनिधी सचिन ठोंबरे याच्यासह बीजीई सोसायटीचे पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.