आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील ओल्या कचऱ्यापासूनच आता होणार बायोगॅसची निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परिसर स्वच्छ राखण्यात लोकसहभाग संत गाडगेबाबांपासून सुरू आहे. आता कुठे कचरामुक्तीसाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी नागरिकही पुढाकार घेत आहेत. परंतु, कचऱ्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळे कचऱ्यापासून अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. प्रत्येक घरात निर्माण होणारा कचरा या अस्वच्छतेस जबाबदार आहे. ही बाब लक्षात घेऊनच येथील अशोक तोष्णीवाल यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे घरातील ओला कचरा बाहेर फेकण्याची गरज नाही. परिणामी, परिसर स्वच्छ आणि घरबसल्या गॅसची निर्मिती. अशा या बायोगॅस निर्मितीकडे आता लोकांचा कल वाढतोय. सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत बॉयोगॅस निर्मितीचा प्रकल्प घरी उभारता येत असल्याने या प्रकल्पात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविल्यास कचरामुक्त शहर होऊन शहरात स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.

दिवसेंदिवस पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ होत आहे. त्यातल्या त्यात घरगुती गॅस आज सर्वांसाठी डोकेदुखी ठरला आहे. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही सिलिंडर मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. सिलिंडरचा सर्वात जास्त त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतो. सिलिंडर संपले की महिलांसमोर सर्वात मोठे संकट उभे राहते. परंतु, हे संकट आता प्रत्येक जण दूर करू शकतो. विशेष म्हणजे हे संकट दूर करताना कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही निकाली निघणार आहे. घरातील शिळे अन्न, उरलेला भाजीपाला, केळ, टरबूज, खरबूज आदींची साल, खरकटे पाणी, खराब झालेले दूध, दही, खाद्य पदार्थ यातून घरबसल्या गॅसनिर्मिती करता येऊ शकते. ही बाब अगदी सहज शक्य आहे. गरज आहे ती पुढाकार घेण्याची. प्रत्येक महिला हे सर्व पदार्थ संकलित करून कचरा म्हणून बाहेर फेकून देतात. त्यामुळे घराबाहेर मात्र कचरा निर्माण होतो आणि यातून कचऱ्याची समस्याही निर्माण होते. परंतु, या बायोगॅसमुळे कचऱ्यासोबत गॅस सिलिंडरची समस्याही संपुष्टात येणार आहे. शहरातील व्यवसायाने टेलर असलेले अशोक तोष्णीवाल यांनी ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ८० ते ९० बायोगॅस त्यांनी तयार करून दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी सिलिंडरची संख्या कमी करण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर सिलिंडरला पर्याय शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

यापूर्वी गोबर गॅस, सोलर सिस्टिम, इंडक्शन आदी पर्याय निघाले. परंतु, यातून सिलिंडरपासून मुक्ती मिळाली नाही. त्यामुळेच वेगळे काही तरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या महत्त्वाच्या कामात त्यांना त्यांचे चिरंजीव संदीप तोष्णीवाल आणि गिरीश राठी यांनी मोलाची मदत केली आणि यातूनच बायोगॅस प्रोजेक्ट साकारला गेला. विशेष म्हणजे वापरायला अत्यंत सोप्या साध्या असलेल्या या बॉयोगॅसपासून कोणताही धोका नाही. या प्रोजेक्टसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यास कचरा सिलिंडरच्या कटकटीतून सर्वांना मुक्तता मिळू शकते.

अत्यंतकमी जागेचा वापर :
घराच्याछतावर पाण्याच्या टाकीला जेवढी जागा लागते, तेवढ्याच जागेत बायोगॅसची टाकी ठेवली जाते. या टाकीतूनच नळीच्या माध्यमातून किचनमधील शेगडीपर्यंत गॅस पोहोचविला जातो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, बाय़ोगॅस विषयीची माहिती...