आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज पळवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गोरक्षण मार्ग परिसरातील कैलासनगरातील अँड. आशीष फुंडकर यांच्या घरी बुधवारी रात्री कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज पळवला.

कैलासनगरमधील अँड. आशीष फुंडकर यांचे कुटुंबीय काही दिवसांपासून बाहेरगावी गेले होते. ते स्वत: न्यायालयात कामानिमित्त गेले होते. याचा फायदा घेत बुधवारी 6 ते 10 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरातील 50 ग्रॅम सोने, 40 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. न्यायालयातून घरी परत आल्यानंतर अँड. आशीष फुंडकर यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पुढील तपास सुरू केला.