आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘होमगार्ड कर्तव्यामध्ये सदैव तत्पर असतात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गृहरक्षक दलाच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. रामदापेठस्थित मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात गृहरक्षक दलाच्या जवानांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
या वेळी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. होमगार्ड कर्तव्यामध्ये सदैव तत्पर असतात, असे मत पोलिस अधीक्षक मिर्श यांनी व्यक्त केले. होमगार्डचे अकोला जिल्हा समादेशक विजय उजवणे म्हणाले की, साधन सामग्रीची कमतरता असतानाही गृहरक्षक दलाचे जवान अविरतपणे कार्य करण्यासाठी तत्पर असतात.
सप्ताहानिमित्त राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन समादेशक अधिकारी पी.जी. तिवारी यांनी केले. सप्ताहमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या जवानांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन मानसेवी अधिकारी गालीब शेख यांनी केले. आभार समादेशक अधिकारी पी. जी. तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसतील नागरिक, आर. एस. मेंढके, आर. एस. चौधरी, एस. एन. पोहरे, एल. डी. रामटेके, एस. एल. सुरोशे, संग्राम गायकवाड, रत्ना पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.